कुछ बहुत अजीब...! नोरा फतेहीसोबत विमानतळावर घडली विचित्र घटना!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 12:01 PM2019-05-12T12:01:36+5:302019-05-12T12:02:18+5:30

नोरा सध्या जोरात आहेत. पण अलीकडे एका घटनेने नोरा कमालीची हिरमुसली. ही घटना कोणती, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला बातमीसोबतचा व्हिडीओ बघावा लागेल.

nora fatehi video went viral but this time not for dance | कुछ बहुत अजीब...! नोरा फतेहीसोबत विमानतळावर घडली विचित्र घटना!

कुछ बहुत अजीब...! नोरा फतेहीसोबत विमानतळावर घडली विचित्र घटना!

googlenewsNext
ठळक मुद्देनोरा सध्या ‘भारत’मध्ये बिझी आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. येत्या ५ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

‘सत्यमेव जयते’ या चित्रपटातील ‘दिलबर’ या गाण्यानंतर नोरा फतेही इंटरनॅशनल स्टार बनलीय. तिचे हे गाणे अनेक भाषेत शूट केले गेलेय. लवकरच नोरा सलमान खान स्टारर ‘भारत’ या चित्रपटात दिसणार आहे. साहजिकच नोरा सध्या जोरात आहेत. पण अलीकडे एका घटनेने नोरा कमालीची हिरमुसली. ही घटना कोणती, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला बातमीसोबतचा व्हिडीओ बघावा लागेल.
नोराने स्वत: आपल्या सोशल अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘कुछ बहुत अजीब होना शुरू हो चुका है....हमारे साथ बने रहिए...,’असे हा व्हिडीओ शेअर करताना नोराने लिहिले आहे.

या व्हिडीओत नोरा तिचा असिस्टंट डायरेक्टर स्टीव्हन रॉय थॉमससोबत दिसतेय. नोरा आणि स्टीव्हन दोघेही दिल्ली विमानतळावरून बाहेर पडत असताना अचानक एक चाहती धावत धावत त्यांच्याकडे येते आणि स्टीव्हनसोबत सेल्फी घ्यायला लागते. बिचारी नोरा, बाजूला उभी राहून थक्क होऊन हे बघत लागते. याचदरम्यान आणखी एक चाहता येतो आणि तो नोरासोबत सेल्फी घ्यायला लागतो.


१७ तासांत हा व्हिडीओ ९ लाखांवर लोकांनी पाहिला. यावर अनेकांच्या मजेदार कमेंटही आल्यात. ‘निराश होऊ नकोस नोरा, कमीत कमी तो सरदार फॅन तर तुला ओळखतो,’ असे एका चाहत्याने हा व्हिडीओ पाहून लिहिले.


नोरा सध्या ‘भारत’मध्ये बिझी आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. येत्या ५ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटात सलमान व कतरीना कैफ लीड रोलमध्ये आहेत. दिशा पाटनी आणि तब्बू यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नोराही यात एका दमदार भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: nora fatehi video went viral but this time not for dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.