OMG!  टायगर श्रॉफला हिरोईन मिळेना!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 06:00 AM2019-02-09T06:00:00+5:302019-02-09T06:00:03+5:30

‘बागी 3’मध्ये टायगरची हिरोईन कोण बनणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. असे का, तर आता त्याचे कारणही  समोर आले आहे.

no female lead finalized yet for tiger shroffs film baaghi 3 | OMG!  टायगर श्रॉफला हिरोईन मिळेना!!

OMG!  टायगर श्रॉफला हिरोईन मिळेना!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘बागी’ व ‘बागी 2’ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘बागी’  मध्ये टायगर श्रॉफसोबत श्रद्धा कपूर दिसली होती.

काही दिवसांपूर्वी  ‘बागी 3’चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आणि चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली. या चित्रपटातही टायगर श्रॉफ हाच लीड रोलमध्ये दिसणार म्हटल्यावर तर चाहते आणखीच हरकले. आता चाहत्यांना प्रतीक्षा होती ती, या चित्रपटात टायगरच्या अपोझिट कोण हिरोईन दिसणार हे जाणून घेण्याची. पण अद्यापही टायगरची हिरोईन कोण, हे ठरलेले नाही.


होय, आधी  ‘बागी 3’मध्ये दिशा पाटनी मुख्य भूमिकेत झळकणार, अशी चर्चा होती. यानंतर अचानक श्रद्धा कपूरचे नाव समोर आले. श्रद्धा कपूरचे चाहते या बातमीचा आनंद साजरा करतील, त्याआधीच श्रद्धाच्या जागी सारा अली खान टायगरची हिरोईन बनणार असल्याचे वृत्त आले. पण हे काय, सारा अलीच्या एन्ट्रीची बातमीही फुस्स निघाली. त्यामुळे  ‘बागी 3’मध्ये टायगरची हिरोईन कोण बनणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. असे का, तर आता त्याचे कारणही  समोर आले आहे. होय, सूत्रांचे मानाल तर  ‘बागी 3’मध्ये टायगर आणि टायगर हाच खरा हिरो असणार आहे. साहजिकच हिरोईनला करण्यासारखे फार काहीही नाही. त्याचमुळे बड्या नट्या या चित्रपटात काम करण्यास फार उत्सूक नाहीत. साराने याचमुळे हा चित्रपट नाकारल्याचे कळतेय. टायगरला अद्यापही हिरोईन मिळाली नाही, त्यामागे हेच खरे कारण आहे.


‘बागी’ व ‘बागी 2’ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘बागी’  मध्ये टायगर श्रॉफसोबत श्रद्धा कपूर दिसली होती. दोघांचीही आॅनस्क्रिन केमिस्ट्री जबरदस्त होती. ‘बागी’ हिट झाल्यानंतर याच्या सीक्वलमध्ये टायगरसोबत त्याची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पटानी झळकली होती. टायगर व दिशाचा रोमान्सही हिट झाला होता.

Web Title: no female lead finalized yet for tiger shroffs film baaghi 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.