'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 12:47 IST2018-08-18T12:21:48+5:302018-08-18T12:47:06+5:30

लग्न सोहळा असेल,पुरस्कार सोहळा असेल किंवा मग आणखीन काही निक आणि प्रियंका दोघेही एकत्रच हातात हात घेत एंट्री मारताना दिसले.

Nick Jonas So much possessive For Priyanka Chopra SEE PICS | 'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो

'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो

सगळीकडे सध्या प्रियंका आणि निकच्या लग्नाच्याच बातम्या ऐकायला मिळत आहे. प्रियांका आणि निक दोघे गेल्या महिन्यात सुमारे आठवडाभर भारतात होते. खास प्रियांकाच्या आईला, कुटुंबाला भेटायला निक भारतात आला होता. भारतात निक, प्रियांका अगदी बिनधास्त एकत्र फिरले, हातात हात घालून पार्ट्यांना पोहोचले. तसेच ते दोघे गोव्याला देखील प्रियांकाच्या कुटुंबियांसोबत गेले होते. तसेच वेळोवेळी प्रियंकाबाबत निक जरा जास्तच पझेसिव्ह असल्याचंही वेळोवेळी पाहायला मिळालं. आपल्या लेडी लव्हला गर्दीत कोणामुळे त्रास होवू नये याचीही तो खूप काळजी घेतो. सतत एकमेकांसह वेळ घालवताना दिसतात.

भारतात आल्यानंतर जिथे प्रियंका जाते तिथे निकही तिच्याबरोबर जातो.त्यामुळे  भारतात सध्या प्रियंका बरोबरच निकच्याही जोरदार चर्चा रंगतात. लग्न सोहळा असेल, पुरस्कार सोहळा असेल किंवा मग आणखीन काही निक आणि प्रियंका दोघेही एकत्रच हातात हात घेत एंट्री मारताना दिसले. निक त्याच्या आणि प्रियांकाच्या नात्याबद्दल खूपच पझेसिव्ह असल्याचे वारंवार पाहायला मिळाले. 

सध्या निक जोनास आणि त्याचे अख्खे कुटुंब मुबईत आले आहेत. प्रियांकाने आयोजित केलेल्या या पार्टीत प्रियांका व निकच्या लग्नाच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष या पार्टीतील घोषणेकडे लागले आहे. ही पार्टी मुंबईत होणार आहे. पण मुंबईत कुठे, म्हणजे पार्टी वेन्यू काय असेल, हे अद्यापही कळलेले नाही.

प्रियांका चोप्राने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच सध्या हॉलिवूडमध्ये देखील तिने तिच्या अभिनयाने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्ये देखील प्रसिद्ध आहे तर निक जोनास हा एक प्रसिद्ध अभिनेता आणि गायक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची ख्याती असून त्याचे आजवरचे अनेक अल्बम फेमस झालेले आहेत.
 

एका पार्टीमध्ये रवीना टंडन आणि प्रियांका चोप्राने सेल्फी काढला आणि रवीनाने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सोशल मीडियावर हा फोटो येताच वाऱ्यासारखा व्हायरल झाला. या फोटोत प्रियांकाने डायमंड रिंग घातल्याचे दिसत आहे. या रिंगवरुनच तिचा साखरपुडा झाल्याचं पक्क मानलं जात आहे. 

 


 

Web Title: Nick Jonas So much possessive For Priyanka Chopra SEE PICS