माही गिलचा धक्कादायक खुलासा, नाइटीमध्ये बघू इच्छित होता दिग्दर्शक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 14:37 IST2018-05-03T09:07:59+5:302018-05-03T14:37:59+5:30

हॉलिवूडनंतर बॉलिवूडमध्येही सातत्याने कास्टिंग काउचशी संबंधित घटनांचा कलाकारांकडून खुलासा केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच तेलगू अभिनेत्री श्री रेड्डी हिने ...

Mahi Gill's shocking disclosure, the director wanted to see in Nite! | माही गिलचा धक्कादायक खुलासा, नाइटीमध्ये बघू इच्छित होता दिग्दर्शक!

माही गिलचा धक्कादायक खुलासा, नाइटीमध्ये बघू इच्छित होता दिग्दर्शक!

लिवूडनंतर बॉलिवूडमध्येही सातत्याने कास्टिंग काउचशी संबंधित घटनांचा कलाकारांकडून खुलासा केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच तेलगू अभिनेत्री श्री रेड्डी हिने अर्धनग्न आंदोलन करीत अनेक निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांची पोलखोल केली होती. आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माही गिलने असाच एक धक्कादायक खुलासा केला आहे. माहीने म्हटले की, ‘एक दिग्दर्शक मला नाइटीमध्ये बघू इच्छित होता. 

‘साहब बीवी और गैंगस्टर’ फेम माही गिलने म्हटले की, ‘बॉलिवूडमध्ये एखादी भूमिका मिळविण्यासाठी दिग्दर्शकांच्या विचित्र डिमांडचा सामना करावा लागतो. एक दिग्दर्शकाकडे जेव्हा मी सलवार-सूट परिधान करून रोल मागण्यासाठी गेली होती. तेव्हा दिग्दर्शकाने म्हटले की, अशाप्रकारचे कपडे घालून येशील तर तुला कोण रोल देणार? तेव्हा आणखी एकाने म्हटले की, यांना तुला नाइटीमध्ये बघण्याची इच्छा आहे. 

याविषयी माही गिलने म्हटले की, चित्रपटसृष्टीतील लोक आणि दिग्दर्शकांच्या या विचित्र मागण्यामुळे मी गोंधळात पडली होती. कारण मला सुरुवातीला असे वाटत होते की, लोक गुणवत्ता बघून रोल आॅफर करतात. मात्र येथे असे काहीच नव्हते. त्यामुळे मी खूप घाबरली होती. त्यानंतर मी दिग्दर्शकांना भेटणे बंद केले. पुढे लोक मला वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देत होते. परंतु काय चांगले अन् काय वाईट यावरून मी गोंधळात पडले होते. पुढे तर मी जेव्हा जेव्हा दिग्दर्शकांना भेटण्यासाठी जात असे तेव्हा-तेव्हा मी माझ्या मित्राला सोबत घेऊन जायचे. 

पुढे बोलताना माहीने म्हटले की, ‘न्यूकमरला बॉलिवूडमध्ये काम मिळविणे म्हणावे तेवढे सोपे नाही. कारण त्यांना येथील वातावरणाविषयी फारसे माहिती नसते. यावेळी माहीला विचारण्यात आले की, तू अशाप्रकारच्या स्थितीला कसे हाताळते? तेव्हा तिने सांगितले की, माझ्याकडे जेव्हा अशाप्रकारचे अश्लील प्रस्ताव ठेवले जातात, तेव्हा मी त्याला चांगलेच ठणकावते. दरम्यान हॉलिवूडपासून ते बॉलिवूडमध्येही अशाप्रकारच्या घटना समोर येऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कारण आतापर्यंत माही गिलप्रमाणे बºयाचशा अभिनेत्रींनी आपल्यावर बितलेली आपबिती सांगितली आहे. 

Web Title: Mahi Gill's shocking disclosure, the director wanted to see in Nite!