कतरिना कैफने व्यक्त केली ही खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 09:41 AM2018-12-22T09:41:14+5:302018-12-22T09:44:34+5:30

बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'झिरो' नुकताच प्रदर्शित झाला.

Katrina Kaif has expressed her feelings | कतरिना कैफने व्यक्त केली ही खंत

कतरिना कैफने व्यक्त केली ही खंत

ठळक मुद्देकतरिना कैफचा झिरो चित्रपट नुकताच झाला प्रदर्शितकतरिना कैफने व्यक्त केली खंत

बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'झिरो' नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता शाहरूख खान व अभिनेत्री अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कतरिना कैफने नुकतीच एक खंत व्यक्त केली. काय खंत असेल, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तिने गेल्या दहा वर्षांत कोणीही मला डेटसाठी विचारले नाही, याची खंत बोलून दाखवली. या तिच्या म्हणण्यावर कोणाचाही विश्वास बसत नसला तरी शपथेवर गेल्या दहा वर्षांत एकानंही आपल्याला डेटसाठी विचारले नाही असे ती सांगते.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या लव लाईफबद्दल सांगितले. या गोष्टीवर कोणालाही विश्वास बसणार नाही मात्र मला कोणीही डेटसाठी गेल्या दहा वर्षात विचारले नाही असे ती म्हणाली. आश्चर्य म्हणजे कतरिना ही वर्षभरापूर्वी अभिनेता रणबीर कपूरला डेट करत होती. ‘अजब प्रेम की गजब’ कहाणीपासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रेमप्रकरणाला जग्गा जासूसच्या सेटवर पूर्णविराम मिळाला. दुर्दैव म्हणजे त्यानंतर काही महिन्यातच रणबीर कतरिनाची जीवलग मैत्रीण आलियाला डेट करू लागला. या नात्यामुळे कतरिना आलियाच्या मैत्रीत कायमचा दुरावा आल्याचे बोलले जात आहे.

त्याआधी कतरिनाचे नाव सलमानसोबतही जोडले गेले होते. इतकेच नाही तर सलमान कतरिनाशी लग्न करणार अशाही चर्चा होत्या. या गोष्टी जगजाहीर असताना कतरिनाने मात्र दहा वर्षांत कोणीही डेटसाठी विचारले नसल्याचे सांगिल्याने सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. 

Web Title: Katrina Kaif has expressed her feelings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.