करीना कपूरने रणवीर सिंगबाबत केले हे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 12:27 PM2018-08-29T12:27:42+5:302018-08-29T12:30:41+5:30

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर आणि बाजीराव रणवीर सिंग हे दोघे निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या तख्त या पीरिएड ड्रामामध्ये दिसणार आहे.

Kareena Kapoor said about Ranveer Singh | करीना कपूरने रणवीर सिंगबाबत केले हे वक्तव्य

करीना कपूरने रणवीर सिंगबाबत केले हे वक्तव्य

googlenewsNext
ठळक मुद्देतख्त सिनेमा करीनासाठी आहे खूप खासकरीना रणवीरसोबत करणार पहिल्यांदाच काम

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर आणि बाजीराव रणवीर सिंग हे दोघे निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या तख्त या पीरिएड ड्रामामध्ये दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने हे दोघे रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. रणवीर सिंगसोबत काम करायचे बऱ्याच दिवसापासून बाकी असल्याचे करीना म्हणाली.

रणवीर हा या पिढीतील उत्तम कलाकार आहे. रणवीरबरोबर काम करणे बऱ्याच दिवसांपासून बाकी होते. त्याच्याबरोबर काम करणे हा एकप्रकारचा बहुमान आहे आणि सरतेशेवटी त्याच्याबरोबर काम करण्याची संधी आपल्याला मिळालीच असे ती म्हणाली.
बऱ्याच कालावधीनंतर धर्मा प्रोडक्‍शनबरोबर काम करत असल्यामुळे तख्त हा सिनेमाही करीनासाठी खूप स्पेशल आहे. यापूर्वी धर्मा प्रॉडक्‍शनसाठी तिने अनेक सिनेमे केले आहेत. पण करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची वेळ बऱ्याच दिवसांनी तिला मिळाली आहे.
करण जोहर अगदी जवळच्या मित्रांपैकी एक आहे. खरे तर तो आपला भाऊच आहे. ज्याच्यावर अधिक विश्‍वास असावा, असा करण आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा करण आणि धर्मा बरोबर काम करते तेव्हा करीनाला घरीच असल्यासारखे वाटते. तख्तमध्ये करीनाबरोबर अलिया भट, भूमी पेडणेकर, विकी कौशल, जान्हवी कपूर आणि अनिल कपूरही असणार आहेत. रणवीर व विकी यात दोन भावांची भूमिका साकारतील. आलिया रणवीरच्या प्रेयसीची तर करिना त्याच्या बहिणीच्या भूमिकेत असेल. जान्हवी कपूर विकी कौशलच्या पत्नीची भूमिका वठवणार आहे. ‘तख्त’ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल. राजसिंहासनावरचे प्रेम आणि ते मिळवण्यासाठीची वाट्टेल त्या स्तराला जाण्याचे मनसुबे असे याचे कथानक असेल. शहाजहान आणि मुमताज यांच्या दोन मुलांच्या अर्थात दोन भावंडांमधील सिंहासनासाठीच्या वादाची कथा यात दिसेल.

Web Title: Kareena Kapoor said about Ranveer Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.