चित्रपटात कमबॅक करण्यासाठी ईशा देओल घेतेय ‘या’ अभिनेत्रीकडून धडे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 14:31 IST2018-03-14T09:01:17+5:302018-03-14T14:31:22+5:30

प्रसिद्ध अभिनेत्री तथा खासदार हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल चित्रपटांमध्ये लवकरच कमबॅक करणार आहे. राम मुखर्जी यांच्या आगामी ...

Isha Deol taking lessons in the film, 'Lessons from the actress' !! | चित्रपटात कमबॅक करण्यासाठी ईशा देओल घेतेय ‘या’ अभिनेत्रीकडून धडे!!

चित्रपटात कमबॅक करण्यासाठी ईशा देओल घेतेय ‘या’ अभिनेत्रीकडून धडे!!

रसिद्ध अभिनेत्री तथा खासदार हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल चित्रपटांमध्ये लवकरच कमबॅक करणार आहे. राम मुखर्जी यांच्या आगामी ‘केकवॉक’ चित्रपटातून ती पुन्हा एकदा आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणार आहे. चित्रपटात ती एका शेफची भूमिका साकारताना बघावयास मिळेल. या भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेत्री आणि तिची बेस्ट फ्रेंड तिला मदत करीत असल्याचे समजते. होय, ईशाची बेस्ट फ्रेंड आणि प्रसिद्ध शेफ आणि अभिनेत्री शिर्लाना वेज ईशाला शेफची भूमिका साकारण्यासाठी बेसिक ट्रेनिंग देत आहे. शिर्लाना वेज बºयाचशा बॉलिवूड चित्रपटांमध्ये बघावयास मिळाली आहे. अभिनेता हृतिक रोशनच्या ‘न तुम जानों न हम’ या चित्रपटात ईशा आणि शिर्लाना यांनी मैत्रिणीची भूमिका साकारली होती. 

तब्बल सात वर्षांनंतर चित्रपटात कमबॅक करणार असल्याने याविषयी बोलताना ईशाने सांगितले की, ‘केकवॉक या चित्रपटाचा विषय आणि त्यातून दिला जाणारा संदेश दोन्ही प्रभावशाली आहे. माझी बेस्ट फ्रेंड शिर्लाना प्रसिद्ध शेफ आहे. शूटिंगअगोदर मी तिची मदत घेणार आहे.’ ‘केकवॉक’ हा एक लघुपट असणार आहे. दरम्यान, ईशा देओलने २००२ मध्ये ‘कोई मेरे दिल से पूछे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्डही मिळाले होते. 

याव्यतिरिक्त ईशा ‘क्या दिल ने कहा, कुछ तो है, एलओसी कारगिल, युवा, धूम, काल, नो एंट्री, डार्लिंग, कॅश, टेल मी ओ खुदा’ यासारख्या चित्रपटांत बघावयास मिळाली आहे. ईशा देओलने ‘आयुथा एजुथु’ या तामिळ चित्रपटामध्येही काम केले आहे. क्लासिकल डान्सर असलेल्या ईशा देओलने १२ फेब्रुवारी २०१२ मध्ये उद्योगपती भरत तखतानी यांच्याबरोबर विवाह केला. २० आॅक्टोबर २०१७ मध्ये तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ईशाने मुलीचे नाव राध्या ठेवले आहे. ईशाने सांगितले होते की, मुलीचे योग्य पालनपोषण करणे यास माझी प्राथमिकता असेल. 

Web Title: Isha Deol taking lessons in the film, 'Lessons from the actress' !!