इरफान खानच्या प्रेमात पडायला भाग पाडणारा ‘कारवां’चा ट्रेलर तुम्ही बघितला?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 12:53 PM2018-06-27T12:53:00+5:302018-06-27T12:53:00+5:30

बॉलिवूड सुपरस्टार इरफान खान याच्या ‘कारवां’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. ट्रेलर बघता, या चित्रपटाची कथा थ्रील ...

Irrfan Khan's caravan 'caravan' trailer you saw? | इरफान खानच्या प्रेमात पडायला भाग पाडणारा ‘कारवां’चा ट्रेलर तुम्ही बघितला?

इरफान खानच्या प्रेमात पडायला भाग पाडणारा ‘कारवां’चा ट्रेलर तुम्ही बघितला?

googlenewsNext
लिवूड सुपरस्टार इरफान खान याच्या ‘कारवां’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. ट्रेलर बघता, या चित्रपटाची कथा थ्रील आणि इमोशन्सने ओतप्रोत भरलेली असणार, हे स्पष्ट होतेय. तीन अनोळखी लोकांख्या अवतीभवती फिरणारी ही कथा. एका अनपेक्षित वळणावर त्यांची ओळख होते. आयुष्याकडे पाहण्याचा या तिघांचाही वेगवेगळा दृष्टिकोन असतो. पण आयुष्यातील काही घटना या तिघांनाही एकत्र आणतात. चित्रपटात इरफान खान, दलकीर सलमान आणि मिथिला पालकर मुख्य भूमिकेत आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर ही कथा नवी भासते आणि तिन्ही कलाकारांचा प्रगल्भ अभिनय मनाला भिडतो. विशेषत: ट्रेलर इरफानचा अभिनय अधिक जिवंत वाटतो. त्याच्या शानदार संवादांना मनापासून दाद द्यावीशी वाटते. एकाठिकाणी इरफान दलकीरला सल्ला देताना दिसतोय. ‘मय्यत पर रोमान्स मत कर..’ असे तो म्हणतोय.  येत्या १० आॅगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. तोपर्यंत ट्रेलर बघा आणि कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.



हा चित्रपट केरळच्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या भागात चित्रीत करण्यात आला आहे. साऊथ इंडस्ट्रीचा स्टार दलकीर सलमान या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतोय. मिथिला पालकर ही सुद्धा या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतेय. त्यामुळे दोघांसाठीही हा चित्रपट महत्त्वाचा आहे.
इरफानबद्दल तर आपण सगळेच जाणतो. इरफानला एका दुर्धर आजाराने घेरले आहे आणि सध्या लंडनमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Irrfan Khan's caravan 'caravan' trailer you saw?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.