inder kumar answered tigmanshu dhulia after criticised his film total dhamaal | तिग्मांशु धुलियांनी ‘टोटल धमाल’ला म्हटले ‘बकवास’! इंद्र कुमारांचा चढला पारा!!
तिग्मांशु धुलियांनी ‘टोटल धमाल’ला म्हटले ‘बकवास’! इंद्र कुमारांचा चढला पारा!!

ठळक मुद्दे‘टोटल धमाल’ या चित्रपटाने तीन आठवड्यांत देशभर १४१ कोटींची कमाई केली आहे आणि जगभरात २०० कोटी कमावले आहेत.

बॉलिवूडचा मल्टिस्टारर चित्रपट ‘टोटल धमाल’ कधीच रिलीज झाला आणि बघता बघता २०० कोटींचा कमाई करून गेला. पण बॉलिवूड दिग्दर्शक तिग्मांशू धूलिया मात्र हा चित्रपट पाहून चांगलेच खवळले. इतके की, हा चित्रपट निव्वळ ‘बकवास’ असल्याचे त्यांनी म्हटले. लोकांनी टेस्ट प्रचंड बिघडलीय, इथपर्यंत ते बोलून गेले. तिग्मांशू धूलियांची ही इतकी तिखट प्रतिक्रिया ‘टोटल धमाल’चे दिग्दर्शक इंद्रकुमार यांना झोंबली नसेल तर नवल. तेही उखडले. मग काय त्यांनी तिग्मांशू यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.

तिग्मांशू धूलिया ‘टोटल धमाल’बद्दल नेमके काय बोलले ते मला ठाऊक नाही. पण हे त्यांचे मत आहे. चित्रपटांबद्दलचे त्यांचे मत मी बदलू शकत नाही. कदाचित त्यांना ‘टोटल धमाल’ कळलाच नसेल किंवा कदाचित त्यांच्या भावना दुखावल्या असतील. ज्यांना चित्रपट आवडतो, त्यांना आवडतो. ज्यांना आवडत नाही, ते शिव्या देतात. हा जीवनाचा भाग आहे, असे इंद्रकुमार म्हणाले.
‘टोटल धमाल’ या चित्रपटाने तीन आठवड्यांत देशभर १४१ कोटींची कमाई केली आहे आणि जगभरात २०० कोटी कमावले आहेत. अजय देवगण, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, अर्शद वारसी, रितेश देशमुख असे अनेक स्टार्स यात मुख्य भूमिकेत आहेत.

तिग्मांशू धूलिया काय म्हणाले होते?
एका इव्हेंटमध्ये बोलताला तिग्मांशू यांनी ‘टोटल धमाल’वर टीका केली होती. ‘टोटल धमाल’चा ट्रेलर बकवास होता. चित्रपटही बकवास निघाला. माझ्या मते, प्रेक्षकांची टेस्ट बदलली आहे. ही टेस्ट अतिशय खराब झाली आहे, असे तिग्मांशू म्हणाले होते.


Web Title: inder kumar answered tigmanshu dhulia after criticised his film total dhamaal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.