How’s The Josh! विकी कौशल व हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब; पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 10:00 AM2019-01-18T10:00:03+5:302019-01-18T10:00:31+5:30

‘राजी’ आणि ‘संजू’ या चित्रपटातील दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकणारा विकी कौशल सध्या जाम खूश आहे. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटानंतर तर विकीचा ‘जोश’ बघण्यासारखा आहे. पर्सनल लाईफमध्येही त्याचा ‘जोश’ पाहण्यासारखा आहे.

How's the Josh! harleen sethi shares a adorable picture with vicky kaushal | How’s The Josh! विकी कौशल व हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब; पाहा, फोटो!!

How’s The Josh! विकी कौशल व हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब; पाहा, फोटो!!

googlenewsNext
ठळक मुद्देविकी व हरलीन यांच्यात प्रेमाची खिचडी शिजतेय, ही बातमी आम्ही फार पूर्वीच तुम्हाला दिली होती. टीव्ही अभिनेत्री, एक यशस्वी मॉडेल आणि एक लोकप्रीय टीव्ही होस्ट हरलीन सेठी हिला विकी कौशल डेट करतोय.

‘राजी’ आणि ‘संजू’ या चित्रपटातील दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकणारा विकी कौशल सध्या जाम खूश आहे. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटानंतर तर विकीचा ‘जोश’ बघण्यासारखा आहे. पर्सनल लाईफमध्येही त्याचा ‘जोश’ पाहण्यासारखा  आहे. होय, हरलीन सेठीसोबतच्या नात्यामुळे विकी सध्या चर्चेत आहेत. 


विकी व हरलीन यांच्यात प्रेमाची खिचडी शिजतेय, ही बातमी आम्ही फार पूर्वीच तुम्हाला दिली होती. टीव्ही अभिनेत्री, एक यशस्वी मॉडेल आणि एक लोकप्रीय टीव्ही होस्ट हरलीन सेठी हिला विकी कौशल डेट करतोय. खरे तर ब-याच दिवसांपासून या दोघांमध्ये प्रेमाचा लपंडाव सुरू आहे. पण आजपर्यंत विकी वा हरलीनने कुणालाही याची कानोकान खबर होऊ दिली नाही. दिग्दर्शक आनंद तिवारीच्या माध्यमातून विकी व हरलीनची भेट झाली.

मग मैत्री आणि मग प्रेम झाले. पुढे ते चोरून-लपून एकमेकांना भेटत राहिले. पण आता कदाचित हे नाते जगापुढे मान्य करण्याची वेळ आली आहे किंवा विकी व हरलीन दोघेही ‘खुल्लम खुल्ला’ प्रेम करू इच्छित आहेत. कारण आता विकी व कौशल दोघेही बिनधास्तपणे एकमेकांसोबत फिरू लागलेत. अगदी सोशल मीडियावर हे दोघेही एकमेकांचे फोटो शेअर करण्यात कचरत नाही. काही तासांपूर्वी हरलीनने विकीसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत हरलीन व विकी दोघेही ‘उरी’ प्रमोट करताना दिसत आहेत. 


कालच ‘उरी’च्या टीमने सक्सेस पार्टी साजरी केली. या पार्टीत अख्खी टीम ‘How’s The Josh’ लिहिलेला स्वेटशर्ट घालून दिसले होते. हरलीननेही सेम टी-शर्ट घातलेला आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे हरलीन ‘उरी’च्या टीममध्ये नसली तरी विकीच्या आयुष्यात मात्र तिने एन्ट्री घेतलीय.

Web Title: How's the Josh! harleen sethi shares a adorable picture with vicky kaushal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.