Disha patani photoshopped video gets viral on social media,19 lakh users seen disha magic | सोशल मीडियावर दिशा पटानीचा धुमाकूळ,इन्स्टाग्रामवरील व्हिडीओला १९ लाखांहून अधिक जणांनी पाहिला
सोशल मीडियावर दिशा पटानीचा धुमाकूळ,इन्स्टाग्रामवरील व्हिडीओला १९ लाखांहून अधिक जणांनी पाहिला

बॉलीवुडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिशा पटानी. तिचं घायाळ करणारं सौंदर्य, अदा आणि अभिनय यावर रसिक फिदा झाले आहेत. त्यामुळंच तिचे आगामी सिनेमा आणि वैयक्तिक जीवनातील घडामोडींवर तिच्या फॅन्सची नजर असते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही दिशा आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. स्वतःचे फोटो, व्हिडीओ दिशा सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करते. तिच्या या फोटोज आणि व्हिडीओला फॅन्सकडून प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळतात. त्यामुळंच की काय दिशाला सोशल मीडिया क्वीनही म्हटलं जातं. नुकतंच दिशानं एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये दिशाचा लूक साधा आहे. यांत दिशाचा संपूर्ण फोटो स्टील असला तरी तिचे केस वाऱ्याने उडावे असे दिसत आहेत. हा व्हीडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १९ लाखांहून अधिक जणांनी पाहिलं आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला रसिकांची पसंती मिळत आहे. 'एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून दिशाने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. त्याआधी 'लोफर' या तेलुगू सिनेमातून दिशाने अभिनयाची इनिंग सुरु केली होती. जॅकी चॅनसह 'कूंग फू योगा' या सिनेमातही दिशाने काम केलं होतं. काही दिवसांपूर्वी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या 'बागी-२' सिनेमातही दिशाच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. 'बागी-२' मध्ये दिशा आणि टायगर श्रॉफची जोडी रसिकांना भावली होती. 

दिशा अॅक्शनच्या बाबतीत तिचा कथित बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ पेक्षा काही कमी नाही असेच म्हणावे लागेल. दिशाच्या आगामी चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर भारतमध्ये ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. यात दिशा सलमानच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातीन देसी गर्ल बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. भारत चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर यात सलमान खान 5 वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. चित्रपटात सलमान 60 वर्षांचे आयुष्य जगताना दाखवण्यात येणार आहे. 52 वर्षांचा सलमान खान ‘भारत’मध्ये 18 वर्षांचा दिसणार आहे.


Web Title: Disha patani photoshopped video gets viral on social media,19 lakh users seen disha magic
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.