दिशा पटानीचा हा अंदाज पाहुन टायगर श्रॉफही होईल दंग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 02:28 PM2018-06-30T14:28:11+5:302018-06-30T14:32:35+5:30

दिशाच्या आगामी चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर भारतमध्ये ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

Tiger Shroff will be surprised to see this Patnai direction | दिशा पटानीचा हा अंदाज पाहुन टायगर श्रॉफही होईल दंग

दिशा पटानीचा हा अंदाज पाहुन टायगर श्रॉफही होईल दंग

googlenewsNext
ठळक मुद्देदिशा अॅक्शनच्या बाबतीत तिचा कथित बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ पेक्षा काही कमी नाही असेच म्हणावे लागेल.

सध्या दिशा पटानीचे स्टार सातवा आसमानपर आहेत. बागी2 च्या यशानंतर दिशा आता सलमान खानच्या भारतमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती इन्स्टाग्रामवरील तिच्या पोस्टला घेऊन देखील चर्चेत असते. नुकताच दिशाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहुन तुम्हीदेखील हैराण व्हाल.    
या व्हिडिओत दिशा खतरनाक स्टंट करताना दिसतेय. ती यात फ्रंट फ्लिप मारताना दिसतेय. दोन दिवसापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओत एकाच दिवसात 22 लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.


दिशा अॅक्शनच्या बाबतीत तिचा कथित बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ पेक्षा काही कमी नाही असेच म्हणावे लागेल. दिशाच्या आगामी चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर भारतमध्ये ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.  यात दिशा सलमानच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातीन देसी गर्ल बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. भारत चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर यात सलमान खान 5 वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. चित्रपटात सलमान 60 वर्षांचे आयुष्य जगताना दाखवण्यात येणार आहे. 52 वर्षांचा सलमान खान ‘भारत’मध्ये 18 वर्षांचा दिसणार आहे. यासाठी खास ऐज रिडक्शन टेक्निक  वापरली जाणार आहे. म्हणजेच, ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. या टेक्निकसंदर्भात मेकर्सनी व्हिएफएक्स टीमसोबत चर्चा केली. याच टीमने ‘फॅन’ या चित्रपटात शाहरूखसाठी काम केले होते. सलमानला वजनही कमी करावे लागणार आहे.  टी-सीरिज या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 2019च्या ईदला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Tiger Shroff will be surprised to see this Patnai direction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.