मेकअपशिवाय अशी दिसते बॉलिवूडची ‘ही’ हॉट अभिनेत्री; फोटो व्हायरल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 05:56 PM2019-06-23T17:56:10+5:302019-06-23T17:56:46+5:30

बॉलिवूड इंडस्ट्रीची बार्बी डॉल कॅटरिना कैफ हिला नुकतेच मुंबई एअरपोर्टवर पाहण्यात आले. तिचा हा अंदाजही एवढा सुंदर दिसत होता की, तिच्यावरून नजर हटत नव्हती.

Bollywood's 'Hot' actress Katrina kaif looks like without makeup; Photo viral! | मेकअपशिवाय अशी दिसते बॉलिवूडची ‘ही’ हॉट अभिनेत्री; फोटो व्हायरल!

मेकअपशिवाय अशी दिसते बॉलिवूडची ‘ही’ हॉट अभिनेत्री; फोटो व्हायरल!

googlenewsNext

बॉलिवूडच्या जगात ग्लॅमर, शानशौक याशिवाय जगणे अगदी अशक्यप्राय गोष्टच म्हणावी लागेल. बॉलिवूड अभिनेत्रींना नेहमीच मेकअपमध्ये आणि स्टायलिश राहायला आवडतं. अशात जेव्हा एखादी अभिनेत्री साध्या लूकमध्ये दिसते तेव्हा चाहते त्यांच्या त्या लूकचे फोटो पाहण्यासाठी फार उत्सुक असतात. अलीकडेच रिलीज झालेल्या ‘कबीर सिंग’ चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणीचा  लूक एकदम साधा होता. तिच्या या डी-ग्लॅम लूकची खूप चर्चा झाली. आता पुन्हा एकदा एका अभिनेत्रीची चर्चा होताना दिसते आहे. ती अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची हॉट अ‍ॅण्ड ब्युटीफुल कॅटरिना कैफ हिची.


 बॉलिवूड इंडस्ट्रीची बार्बी डॉल कॅटरिना कैफ हिला नुकतेच मुंबई एअरपोर्टवर पाहण्यात आले. तिचा हा अंदाजही एवढा सुंदर दिसत होता की, तिच्यावरून नजर हटत नव्हती. कॅटरिना फारच साध्या लुकमध्ये होती. ती इतकी सुंदर दिसत होती की, तिला पाहून सगळ्यांच्या तोंडी सुंदर दिसावं तर कॅटरिनासारखंच असंच सारे म्हणत होते.

कॅटरिनाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, लवकरच ती रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. रिपोर्टनुसार, यात ती अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. याआधी अक्षय आणि कतरिनाने तीस मार खां, दे दना दन, वेलकम यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांना नेहमीच आवडली असून त्यांचे अधिकतर सिनेमे हिट झाले आहेत. पुढच्या वर्षी २७ मार्चला सूर्यवंशी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सध्या ती ‘भारत’ सिनेमाच्या यशाची चव चाखत आहे. सलमान खानचा हा सिनेमा ब्लॉकबस्टर कमाई करत आहे. आतापर्यंत या सिनेमाने २५० कोटींचा पल्ला गाठला आहे. भारत अली अब्बास आणि सलमानचा सलग तिसरा हिट सिनेमा आहे. याआधी दोघांनी टायगर जिंदा है, सुल्तान या दोन सिनेमात एकत्र काम केलं होतं.

Web Title: Bollywood's 'Hot' actress Katrina kaif looks like without makeup; Photo viral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.