Birthday Special : सनी देओलच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या या नट्या...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 11:53 AM2018-10-19T11:53:32+5:302018-10-19T11:54:23+5:30

सनी देओलने आपल्या अ‍ॅक्शनच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. एकेकाळी सनीसाठी चित्रपट लिहिले जात. कारण जगभरात सनीचे चाहते होते. आजही आहेत. 

Birthday Special: sunny deol had an affair with these actresses | Birthday Special : सनी देओलच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या या नट्या...!!

Birthday Special : सनी देओलच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या या नट्या...!!

googlenewsNext

सनी देओलने आपल्या अ‍ॅक्शनच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. एकेकाळी सनीसाठी चित्रपट लिहिले जात. कारण जगभरात सनीचे चाहते होते. आजही आहेत. आज सनी आठवायचे कारण म्हणजे आज(१९ आॅक्टोबर) सनी देओचा वाढदिवस.

खरे सांगायचे तर सनीचे चित्रपट जितके गाजलेत, त्यापेक्षा अधिक त्याच्या अफेअरच्या चर्चा गाजल्या. ‘बेताब’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अमृता सिंग झळकली होती.  ‘बेताब’च्या या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. त्याकाळात या  ‘बेताब’ जोडीच्या अफेअरची चर्चाही चवीने चघळली गेली.  या चित्रपटादरम्यान सनी व अमृता एकमेकांच्या अतिशय जवळ आले होते, असे म्हणतात.
अभिनेत्री अमृताचे सनीवर खूप प्रेम होते. पण सनी मात्र पूर्ण जगासमोर हे नाते  मान्य करण्यास तयार नव्हता.  तो या नात्याला खुल्यापणाने स्वीकारण्यास नव्हता.  दुसरीकडे अमृताच्या आईला देखील हे नातं मान्य नव्हतं. याचदरम्यान अमृताने सनीची बाहेरून चौकशी करण्यास सुरूवात केली आणि सनीचे लंडनमध्ये राहणा-या पूजा नावाच्या मुलीसोबत  अफेअर असल्याचे तिला कळले. अर्थात अमृता सनीच्या प्रेमात इतकी वेडी होती. सुरूवातीला सनी व पूजाच्या नात्यांवर ती विश्वास ठेवायला तयार नव्हती. सनी कामाच्या निमित्ताने नेहमी लंडनला जात असे. एवढेच अमृताला माहित होते. पण पुढे सनी व पूजाचे केवळ अफेअर नाही तर दोघांचेही लग्न झाले आहे, हे अमृताला कळले. सनीने लग्नाची गोष्ट अख्ख्या जगापासून लपवून ठेवली होती. पण  एक ना एक दिवस सत्य बाहेर येतेच. अखेर सनीच्या लग्नाची बातमी पेपरमध्ये झळकली. पण तरीही सनी लग्न झाले ही गोष्ट मान्य करण्यास तयार नव्हता. अर्थात तोपर्यंत सनी आणि अमृता यांचे नाते  संपुष्टात आले होते. 

यानंतर सनीच्या आयुष्यात आली ती डिम्पल कपाडिया. दोघांनीही अनेक हिट चित्रपट दिलेत. १९८४ मध्ये ‘मंजिल-मंजिल’ या चित्रपटात ही जोडी झळकली. ती इतकी हिट झाली की, या जोडीला साईन करण्यासाठी दिग्दर्शकांमध्ये जणू स्पर्धा लागली. त्यामुळे अर्जुन, आग का गोला, नरसिम्हा, गुनाह अशा अनेक चित्रपटात सा जोडीने एकत्र काम केले. चित्रपटात एकमेकांसोबत रोमान्स करता करता ही जोडी रिअल लाईफमध्येही रोमान्स करू लागली. सनी देओल विवाहित होता. पण तोही डिम्पलच्या प्रेमात पडला होता. त्याकाळात डिम्पल राजेश खन्ना यांच्यापासून वेगळी राहत होती. सनी व डिम्पलची प्रेमकहाणी तब्बल ११ वर्षे चालली. या दोघांनी गुपचूप लग्न केले, अशाही बातम्या त्यावेळी आल्यात. अर्थात सनी व डिम्पल यांनी कधीही हे मान्य केले नाही. 
 

यानंतर सनीचे नाव अभिनेत्री रवीना टंडनसोबतही जोडले गेले. अक्षय कुमार व रवीनाचे ब्रेकअप झाल्यानंतर सनी व रवीना जवळ आलेत, असे म्हटले जाते़.

Web Title: Birthday Special: sunny deol had an affair with these actresses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.