Birthday Special: तर मी तुला घराबाहेर काढेल...; फरहान अख्तरला आईने दिली होती तंबी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 06:00 AM2019-01-09T06:00:00+5:302019-01-09T06:00:07+5:30

अभिनेता फरहान अख्तरचा आज (९ जानेवारी)वाढदिवस. प्रसिद्ध गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर आणि स्क्रिप्ट रायटर हनी ईरानी यांचा मुलगा फरहान केवळ अभिनेताचं नाही तर निर्माता, दिग्दर्शक, सिंगर अशीही त्याची ओळख आहे.

Birthday Special: Interesting lesser known facts about Farhan Akhtar | Birthday Special: तर मी तुला घराबाहेर काढेल...; फरहान अख्तरला आईने दिली होती तंबी!!

Birthday Special: तर मी तुला घराबाहेर काढेल...; फरहान अख्तरला आईने दिली होती तंबी!!

googlenewsNext

बॉलिवूडचा ‘आॅल राऊंडर’अभिनेता फरहान अख्तरचा आज (९ जानेवारी)वाढदिवस.  प्रसिद्ध गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर आणि स्क्रिप्ट रायटर हनी ईरानी यांचा मुलगा फरहान केवळ अभिनेताचं नाही तर निर्माता, दिग्दर्शक, सिंगर अशीही त्याची ओळख आहे.प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी फरहानची सावत्र आई आहे.  ९ जानेवारी १९७४ रोजी मुंबईत फरहानचा जन्म झाला. फरहानने खूपच कमी वयात बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली आणि बघता बघता, बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज फरहानबद्दलच्या काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत...

आजही या एका गोष्टीचा पश्चाताप...
फरहान अख्तरने अनेक चित्रपटात अभिनय केला. अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले, काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले. पण याऊपरही एका गोष्टीचा त्याला आजही पश्चाताप होतो. तो म्हणजे एक चित्रपट नाकारल्याचा. होय, ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट नाकारल्याचे दु:ख आजही फरहानला सतावते.  ‘रंग दे बसंती’मध्ये आमिर खान मुख्य भूमिकेत होता. पण आमिरआधी ही भूमिका फरहानला आॅफर झाली होती. पण फरहाने काही कारणास्तव हा चित्रपट नाकारला आणि ही भूमिका आमिरच्या झोळीत पडली. आजही फरहानला त्या नकाराचा  पश्चाताप वाटतो. 

५० पेक्षा अधिक वेळ पाहिला ‘शोले’
  फरहानला चित्रपटाविषयी प्रचंड प्रेम होते. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी चित्रपटांनी त्याला जणू झपाटले होते. त्यामुळे अनेक तास तो निव्वळ चित्रपट पाहण्यात घालवत असे. ‘शोले’ हा चित्रपट तर त्याने आजवर ५० पेक्षा अधिक वेळा पाहिला आहे.  

आईने दिली होती तंबी...
  फरहान त्याच्या आईचा प्रचंड लाडका आहे. पण लहानपणापासून तो त्याच्या आईला प्रचंड घाबरायचा. आयुष्यात तू यश मिळवू शकला नाहीस तर तुला मी घराच्या बाहेर काढेन, असे आईने एकदा त्याला बजावले होते. त्यामुळे आयुष्यात यश मिळवायचेच, हे फरहानने ठरवले होते.  फरहानने कॉलेजमध्ये असतानाच त्याचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले.  या प्रॉडक्शन हाऊसने आजवर रईस, दिल धडकने दो, जिंदगी न मिलेगी दोबारा यांसारख्या हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे.

लग्नाआधी या अभिनेत्रीशी होते अफेअर
फरहानचे लग्न २००० मध्ये अधुनासोबत झाले. ते दोघे अनेक वर्षं नात्यात होते. त्यांनी अनेक वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले. अर्थात दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१६ मध्ये फरहान व अधुनाचा घटस्फोट झाला.  अधुना आणि फरहानची ओळख मॉडलिंगच्या दिवसांत झाली होती. फरहानने अनेक वर्षं मॉडलिंगच्या क्षेत्रात काम केले आहे. पण अधुना फरहानच्या आयुष्यात येण्याआधी तो एका अभिनेत्रीसोबत नात्यात होता आणि या अभिनेत्रीसोबत त्याला लग्न देखील करायचे होते. अभिनेत्री सुमन रंगनाथनने ‘फरेब’या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली, त्यानंतर ती अक्षय खन्नासोबत ‘आ अब लौट चले’ या चित्रपटातही झळकली होती. फरहानच्या मॉडलिंग करियरच्या सुरुवातीच्या काळात तो सुमन सोबत नात्यात होता. सुमन त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती. पण तरीही तो तिच्यासोबत लग्न करायला तयार होता. पण सुमनला कोणत्याच नात्यात अडकण्याची इच्छा नव्हती. तिला तिचे स्वतंत्र आयुष्य जगायचे होते आणि त्याचमुळे ते दोघे वेगळे झाले आणि काही काळानंतर अधुना फरहानच्या आयुष्यात आली.

शिबानी दांडेकरची एन्ट्री
पत्नी अधुनासोबत घटस्फोट झाल्यानंतर तूर्तास फरहान अभिनेत्री शिबानी दांडेकरला डेट करतोय. तूर्तास दोघांच्याही अफेअरची चांगलीच चर्चा आहे.

Web Title: Birthday Special: Interesting lesser known facts about Farhan Akhtar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.