OMG! इतके करूनही अमिताभ बच्चन झालेत ट्रोल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 03:21 PM2019-06-16T15:21:45+5:302019-06-16T15:22:30+5:30

काल गुजरातमधील एका हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अमिताभ बच्चन यांनीही ट्वीट केले अन् ते ट्रोल झालेत.

amitabh bachchan share tweet about gujrat septic tank accident get trolled | OMG! इतके करूनही अमिताभ बच्चन झालेत ट्रोल!!

OMG! इतके करूनही अमिताभ बच्चन झालेत ट्रोल!!

googlenewsNext
ठळक मुद्देबिग बी यांच्या या ट्वीटवर संमिश्र प्रतिसाद उमटताना दिसत आहेत.

काल गुजरातमधील एका हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. गुजरातेतील या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये २२ आणि २४ वर्षांची तरूण मुले होती. त्यामुळे अनेकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर सक्रिय असलेले आनंद महिन्द्रा हेही त्यापैकीच एक. आनंद महिन्द्रा यांनी गुजरातमधील या दुर्दैवी घटनेबद्दल ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला.
‘आता खूप झाले. लोकांच्या आयुष्याशी खेळणे पुरे झाले. काही दिवसांपूर्वी मी स्वयंचलीत स्कॅव्हेंगिंग मशीनबद्दल ट्वीट केले होते. एका होतकरू मुलाने हे मशिन तयार केले आहे. इतरांनीही वेग वेगळ्या पद्धतीने हे मशीन तयार केले आहे. त्यांनी बनवलेले मशिन स्वीकारण्यात कुठली अशी अडचण येतेय. मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी पैसा कसा उभा करायचा हा प्रश्न असेल तर माझा विचार नक्की व्हावा,’ असे आनंद महिन्द्रा यांनी ट्वीटमध्ये लिहिले.




आनंद महिन्द्रांचे हे ट्वीट वाचल्यानंतर अमिताभ बच्चन यांना राहावले नाही. त्यांनीही एक ट्वीट केले. ‘आनंद, मी बृहन्मुंबई महानगरपालिकेला २५ मशीन आणि एक ट्रक दिला आहे. मशीन वैयक्तिक लोकांना भेट देण्यात आली असून ट्रक बीएमसीला देण्यात आला आहे. औरंगाबादेत या उत्पादनांची निर्मिती होते. आतापर्यंत मी याबद्दल काही बोललो नव्हतो. कारण मी काय दिले हे सांगण्यासाठी ती भेट दिलेली नव्हती. जे घडले ते दु:खद आहे,’ असे ट्वीट त्यांनी केले. पण त्यांचे हे ट्वीट पाहून अनेकांनी त्यांना ट्रोल केले.








तुम्ही काय भेट दिली हे जर तुम्हाला सांगायचेच नव्हते तर आता तरी का सांगितले,असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी अमिताभ यांना विचारला. अर्थात अनेकांनी बिग बी यांची बाजूही उचलून धरली. या घटनेशी निगडीत गोष्ट होती म्हणून अमिताभ यांनी त्या भेटीचा उल्लेख केला, असे म्हणत काही चाहत्यांनी बिग बींना ट्रोल करणाऱ्यांना फटकारले.

Web Title: amitabh bachchan share tweet about gujrat septic tank accident get trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.