​सोफिया हयातने लांघल्या सर्व मर्यादा; शेअर केला पतीसोबतचा ‘इंटिमेट’ व्हिडिओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 10:42 IST2017-06-15T05:12:55+5:302017-06-15T10:42:55+5:30

काही दिवसांपूर्वी सोफियाने स्वत:पेक्षा दहा वर्षे लहान ब्लाद स्टॅनेस्कूसोबत लग्न केले. आता तिने आपल्या पतीसोबतचा एक बोल्ड आणि रोमँटिक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.

All limits for Sofia Hayat; Shared 'intimate' video with husband! | ​सोफिया हयातने लांघल्या सर्व मर्यादा; शेअर केला पतीसोबतचा ‘इंटिमेट’ व्हिडिओ!

​सोफिया हयातने लांघल्या सर्व मर्यादा; शेअर केला पतीसोबतचा ‘इंटिमेट’ व्हिडिओ!

खी सावंतनंतर सोफिया हयात सध्या नवनव्या वादांमुळे चर्चेत आहे. होय, मॉडेलिंग विश्वातून बाहेर पडून सोफिया नन झाली. मग अचानक तिने सोशल मीडियावर स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करणे सुरु केलेत. अगदी अलीकडे सोफियाने स्वत:ला ‘अल्लाह माँ’ संबोधले होते. काही दिवसांपूर्वी सोफियाने स्वत:पेक्षा दहा वर्षे लहान ब्लाद स्टॅनेस्कूसोबत लग्न केले. आता  तिने आपल्या पतीसोबतचा एक बोल्ड आणि रोमँटिक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. ‘हा आमचा नवीन म्युझिक व्हिडिओ आहे जो आज लाँच झालाय,’ असे कॅप्शन देऊन पुढे ‘ओम शांती ओम’, असे तिने लिहिलेय. आपण पतीसोबत मिळून लोकांना लैंगिक शिक्षण देणार, असे सोफियाने म्हटले होते. कदाचित तिचा हा पतीसोबतचा ताजा व्हिडिओ त्याचाच एक भाग असावा. पण या व्हिडिओत सोफियाने सगळ्या मर्यादा लांघल्या आहेत. यात ती पतीसोबत बरीच क्लोज होताना दिसतेय.



ALSO READ : नन बनलेल्या सोफिया हयातच्या शाही विवाहाचे पहा फोटो!!

 एकंदर काय तर, आपल्या या वादग्रस्त कारनाम्यांमुळे सोफिया दुसरी राखी सावंत बनली आहे. आपल्या या कारनाम्यांमुळे तिला अनेकदा लोकांच्या रोषालाही सामोरे जावे लागलेय. यापूर्वी  सोफियाने  तळव्यांवर  टॅटूचा गोंदवून त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तिच्या या फोटोवर लोकांनी चांगल्याच संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या.   स्वस्तिक या चिन्हाचे हिंदू धर्मात धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे सोफियाच्या या टॅटवर सुमारे दोनशेवर लोकांनी कमेंट देत तिच्या या कृत्याची निंदा केली होती. काही लोकांनी सोफियाला देशाबाहेर हाकलून देण्याची तर  काहींनी तिला कायदेशीर नोटीस पाठविण्याची धमकी दिली होती.सध्या तिच्या पतीसोबतच्या व्हिडिओवरही लोकांनी तिखट प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.  

Web Title: All limits for Sofia Hayat; Shared 'intimate' video with husband!