After two months Irrfan Khan made 'Oh' tweet | दोन महिन्यानंतर इरफान खानने केले 'हे' ट्वीट

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता इरफान खान एंडोक्राईन ट्यूमर’ या दुर्धर आजाराने पीडित आहे. इरफानवर सध्या लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. इरफानने आपल्या आजाराबाबत ट्विटर अकाऊंटवरुन खुलासा केला होता. लंडनला गेल्यावर दोन महिन्यानंतर इरफानने ट्वीट केले आहे. इरफान आपला आगामी चित्रपट 'कारवां'चे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करताना इरफानने लिहिले आहे की, ''सुरुवातीच्या निरागसतेचा अनुभव विकत घेता येऊ शकत नाही.  दिलकर आणि मिथिलालाचे आभार 'कारवां'मध्ये एकत्र आल्याबदल. दोन 'कारवां'चालू आहेत एक म्हणजे चित्रपट आणि दुसरा मी.'' इरफानचा हा चित्रपट 10 ऑगस्टला रिलीज होणार आहे. हा एका कॉमेडी चित्रपट आहे. 

काही महिन्यांपूर्वी इरफानने एक सावलीचा फोटो शेअर केला होता त्यासोबत एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. ‘परमेश्वर आपल्यासोबत गुपचूप चालतो आणि तितक्याच हळूवार आपल्यासोबत बोलतो.  तो एका जळत्या वातीसारखा आहे. ज्याच्या सावलीखाली आपण चालत असतो. आयुष्यात जे काही होतंय, ते होऊ द्या. मग ते चांगले असो वा वाईट. फक्त चालत राहा. कारण कुठलीही भावना अखेरची नाही. यालाच आयुष्य म्हणतात... ’ अशा आशयाची ही कविता इरफानने शेअर केली होती. त्याआधी इऱफानने आपल्या आजाराबाबतचा खुलासा सोशल मीडियावरुन केला होता.''मला न्यूरो इंडोक्राईन ट्युमर नामक आजार झाल्याचे निदान झाले आहे. हा आजार स्वीकारणे सोपे नाही. पण माझ्या आजुबाजुला असलेल्या लोकांचे प्रेम आणि प्रार्थना यामुळे माझी आशा कायम आहे. उपचारासाठी मी विदेशात जातो आहे.'' 

ALSO READ :  असे आहे इरफान खानचे ड्रिम होम, पाहा फोटो!

सलाम बॉम्बे, फुटपाथ,साढे सात फेरे, पीकू, मदारी, पान सिंह तोमर,लाईफ इन मेट्रो,लाईफ आॅफ पाय, हिंदी मीडियम यासारख्या चित्रपटांत इरफान दिसला आहे. आपल्या नैसर्गिक अभिनयासाठी ओळखला जाणाºया इरफानचा स्वत:चा एक चाहता वर्ग आहे.
   
Web Title: After two months Irrfan Khan made 'Oh' tweet
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.