आलिया आणि जॅकलिननंतर सिद्धार्थच्या आयुष्यात आलं नवं प्रेम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 10:08 IST2018-08-01T09:59:32+5:302018-08-01T10:08:09+5:30

सिद्धार्थ मल्होत्राने 'स्टुडंट ऑफ द ईअर'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर आलिया भट्टसोबत त्याचे नाव जोडण्यात आले. सिद्धार्थ आणि आलिया एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सतत कानावर आल्या.

After Alia Bhatt new love came into Sidharth Malhotra life kiara advani | आलिया आणि जॅकलिननंतर सिद्धार्थच्या आयुष्यात आलं नवं प्रेम?

आलिया आणि जॅकलिननंतर सिद्धार्थच्या आयुष्यात आलं नवं प्रेम?

ठळक मुद्देसिद्धार्थच्या आयुष्यातून आलिया आणि जॅकलिनची एक्झिट झाल्यानंतर तो सिंगल नाहीयफिल्मफेयरच्या रिपोर्टनुसार कियारा आणि सिद्धार्थ सतत एकमेकांशी फोनवर बोलत असतातकरण जोहरच्या सिनेमात सिद्धार्थच्या अपोझिट कियाराची वर्णी देखील लागल्याची चर्चा आहे

सिद्धार्थ मल्होत्राने 'स्टुडंट ऑफ द ईअर'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर आलिया भट्टसोबत त्याचे नाव जोडण्यात आले. सिद्धार्थ आणि आलिया एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सतत कानावर आल्या. सगळे काही ठिक चालू आहे असे वाटत असतानाच दोघांचे रस्ते वेगळे झाले.  


 त्यानंतर सिद्धार्थचे नाव जॅकलिनशी जोडण्यात आले तर आलियाचे नाव रणबीर कपूरसोबत. 'ए जेंटलमॅन'च्या सेटवर सिद्धार्थ आणि जॅकलिनच्या कथित अफेअरला सुरुवात झाली आणि सिनेमा रिलीज झाल्यानंतर ते संपले ही. आलियाने शूटिंग दरम्यान वारंवार सिद्धार्थला जॅकलिनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता मात्र सिद्धार्थने त्याकडे दुर्लक्ष केले आणि दोघांच्या नात्यात दुरावा आला. त्यानंतर आलियाच्या आयुष्यात रणबीर कपूरची एंट्री झाली. 


सिद्धार्थच्या आयुष्यातून आलिया आणि जॅकलिनची एक्झिट झाल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की तो सिंगल आहे तर असे अजिबात नाही. सिद्धार्थला आपले नवं प्रेम सापडले आहे. बी टाऊनमधून मिळत असलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ सध्या कियारा अडवाणीला डेट करतोय.  


फिल्मफेयरच्या रिपोर्टनुसार कियारा आणि सिद्धार्थ सतत एकमेकांशी फोनवर बोलत असतात. दोघे एकत्र वेळदेखील स्पेंट करतात. अनेक वेळा दोघ करण जोहरच्या घरी एकत्र दिसले आहेत. ऐवढेच नाही तर करण जोहरच्या सिनेमात सिद्धार्थच्या अपोझिट कियाराची वर्णी देखील लागल्याची चर्चा आहे. सिद्धार्थ विक्रम बत्राच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. यात त्याच्यासोबत कियारा सुद्धा दिसणार आहे. विक्रम बत्राच्या बायोपिकबाबत बोलायचे झाले तर हा सिनेमा कागरिल युद्धावर आधारित आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहर आणि शब्बीर बॉक्सवाला एकत्र येऊन करणार आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन विष्णु वर्द्धन करणार आहे. यासिनेमाच्या माध्यमातून विष्णु दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतो आहे. 
 

Web Title: After Alia Bhatt new love came into Sidharth Malhotra life kiara advani