‘सेक्रेड गेम्स’मधील न्यूड सीन्स व्हायरल, राजश्री देशपांडेला लोक पाठवताहेत अश्लिल संदेश!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 19:39 IST2018-07-15T19:37:23+5:302018-07-15T19:39:03+5:30

‘एस दुर्गा’ या वादग्रस्त चित्रपटात काम करणारी अभिनेत्री राजश्री देशपांडे सध्या पुन्हा चर्चेत आहे. होय, नेटफ्लिक्स ओरिजनलवरील ‘सेक्रेड गेम्स’ या सीरिजमध्ये राजश्रीने दिलेले काही न्यूड सीन्स चर्चेला कारण ठरताहेत.

actress rajshri deshpande topless video viral receiving vulgur messages | ‘सेक्रेड गेम्स’मधील न्यूड सीन्स व्हायरल, राजश्री देशपांडेला लोक पाठवताहेत अश्लिल संदेश!!

‘सेक्रेड गेम्स’मधील न्यूड सीन्स व्हायरल, राजश्री देशपांडेला लोक पाठवताहेत अश्लिल संदेश!!

‘एस दुर्गा’ या वादग्रस्त चित्रपटात काम करणारी अभिनेत्री राजश्री देशपांडे सध्या पुन्हा चर्चेत आहे. होय, नेटफ्लिक्स ओरिजनलवरील ‘सेक्रेड गेम्स’ या सीरिजमध्ये राजश्रीने दिलेले काही न्यूड सीन्स चर्चेला कारण ठरताहेत. या सीरिजमध्ये राजश्रीने गँगस्टर गणेश गायतोंडेच्या (नवाजुद्दीन सिद्दीकीने ही भूमिका साकारली आहे.) पत्नीची भूमिका साकारली आहे. यात राजश्रीची भूमिका म्हणायला लहान पण तेवढीच महत्त्वपूर्ण आहे.  राजश्रीने  नवाजुद्दीनसोबत काही इंटिमेट सीन्स दिले आहेत, यात काही न्यूड सीन्सही आहेत. पण या बोल्ड सीन्समुळे सध्या राजश्रीला अनेक अश्लिल प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. अनेकांनी तिला ‘पॉर्न स्टार्स’च्या यादीत नेवून बसवले आहे.

 खुद्द राजश्रीने एका ताज्या मुलाखतीत याचा खुलासा केला. ती म्हणाली की, हे सीन्स देणे माझ्यासाठी बरेच आव्हानात्मक होते. पण कथेची मागणी लक्षात घेऊन मी ते दिलेत. यानंतर काही दिवसांत माझे हे सीन्स व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झालेत. काहींनी तिचे हे न्यूड सीन्स पॉर्न साईट्सवरही टाकले.  मला पॉर्न स्टार ठरवले गेले. ‘एस दुर्गा’च्यावेळीही लोकांनी मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. काहींनी माझ्या चेह-यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकीही दिली होती. पण या अशा धमक्यांना आणि ट्रोलिंगला मी घाबरत नाही. ‘सेक्रेड गेम्स’मध्ये काम करताना मला अनुराग कश्यपवर पूर्ण विश्वास होता. आजही आहे. या सीन्समुळे तुला त्रास झाल्यास सांग. आपण ही दृश्ये काढून टाकू, असा शब्द त्याने मला दिला होता.पण मी काहीही चुकीचे केले नाही. कथेची गरज लक्षात घेऊन मी ते सीन्स दिलेत. या सीन्ससाठी मला ट्रोल व्हावे लागले, तरी चालेल.

राजश्रीने बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं ते २०१२ साली. आमिर खानच्या 'तलाश' सिनेमात तिला एक छोटी भूमिका मिळाली होती. त्यानंतर राजश्रीने मालिकांकडे आपला मोर्चा वळवला. 'कुछ तो लोग कहेंगे' या मालिकेत तिने काम केले. 

 

 

Web Title: actress rajshri deshpande topless video viral receiving vulgur messages