Abhishek Bachchan and Taapsee to reunite for Sahil Ludhianvi biopic? | ठरले तर, साहिर लुधियानवीच्या बायोपिकमध्ये आता दिसणार तापसी पन्नू!!
ठरले तर, साहिर लुधियानवीच्या बायोपिकमध्ये आता दिसणार तापसी पन्नू!!

ठळक मुद्देयापूर्वी अभिषेक व तापसी या जोडीने अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियां’मध्ये एकत्र काम केले आहे.

संजय लीला भन्साळी यांनी नुकतीच ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाची घोषणा केली. भन्साळींच्या या चित्रपटात सलमान खान आणि आलिया भटची जोडी दिसणार आहे. साहजिकच चाहते हरकले आहेत. अशात भन्साळींच्या आणखी एका आगामी चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. होय, आम्ही बोलतोय ते साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकबद्दल. गेल्या अनेक दिवसांपासून या बायोपिकची चर्चा सुरु आहे. सुप्रसिद्ध कवी आणि लेखक साहिर लुधियानवी यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याची इच्छा भन्साळींनी बोलून दाखवली, त्याला आता बराच काळ लोटला. यानंतर भन्साळी या बायोपिकवर काहीही बोललेले नाहीत. पण त्यांच्या या बायोपिकच्या स्टारकास्टबद्दल मात्र रोज नवी खबर येतेच येते.

सर्वप्रथम भन्साळींच्या या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन- प्रियंका चोप्राची जोडी दिसणार, अशी बातमी आली. नंतर पीसीने अभिषेकसोबत काम करण्यास नकार दिल्याची खबर आली. तिच्या नकारानंतर या बायोपिकमध्ये अभिषेक त्याची बेटरहाफ ऐश्वर्या राय बच्चनसोबत दिसणार, अशी चर्चा रंगली. आता आणखी एक नवी बातमी आहे. ताजी बातमी खरी मानाल तर भन्साळींनी या चित्रपटासाठी लीड अ‍ॅक्टर्स फायनल केले आहेत. होय, मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात अभिषेक बच्चनच्या अपोझिट अभिनेत्री तापसी पन्नू हिची निवड करण्यात आलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तापसीला ही कथा प्रचंड आवडली आणि तिने लगेच या बायोपिकसाठी होकार दिला. अर्थात अद्याप तिने हा चित्रपट साईन केलेला नाही.

या बायोपिकमध्ये अभिषेक साहिर यांच्या भूमिकेत तर तापसी अमृता प्रीतम यांच्या भूमिकेत दिसेल. यापूर्वी अभिषेक व तापसी या जोडीने अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियां’मध्ये एकत्र काम केले आहे.


Web Title: Abhishek Bachchan and Taapsee to reunite for Sahil Ludhianvi biopic?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.