Lok Sabha Election 2019 : औरंगाबाद लोकसभेसाठी मतदानाचा टक्का पाहिजे तसा वाढलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 05:56 PM2019-04-25T17:56:48+5:302019-04-25T17:58:34+5:30

यावेळी केवळ १.५६ टक्क्यांनी मतदान वाढले

Lok Sabha Election 2019: Aurangabad does not have to increase the percentage of votes required for the Lok Sabha elections | Lok Sabha Election 2019 : औरंगाबाद लोकसभेसाठी मतदानाचा टक्का पाहिजे तसा वाढलाच नाही

Lok Sabha Election 2019 : औरंगाबाद लोकसभेसाठी मतदानाचा टक्का पाहिजे तसा वाढलाच नाही

googlenewsNext

औरंगाबाद लोकसभेसाठी मतदानाचा टक्का पाहिजे तसा वाढलाच नाही
शहरी भागातील पूर्व मतदारसंघात, तर ग्रामीणमध्ये वैजापूरमध्ये टक्का घसरला
- विकास राऊत
औरंगाबाद : २०१४ सालच्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का पाहिजे तसा वाढलाच नाही. २३ एप्रिल रोजी निवडणुकीसाठी ६३.४१ टक्के मतदान झाले. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत ६१.८५ टक्के मतदान झाले होते. यावेळी केवळ १.५६ टक्क्यांनी मतदान वाढले. 
२०१४ साली १५ लाख ३७ हजार ७०८ मतदार होते. २०१९ साली १८ लाख ८६ हजार २९४ मतदार झाले. ३ लाख ४८ हजार ५८६ मतदार वाढले; परंतु त्या तुलनेत मतदान वाढले नाही. २०१४ साली ९ लाख ७६ हजार ११० मतदान झाले होते. या निवडणुकीत ११ लाख ९५ हजार २४२ मतदान झाले. २ लाख १९ हजार १३२ मतदान या निवडणुकीत जास्त झाले. ६ लाख ५८ हजार १६७ पुरुष, तर ५ लाख ३७ हजार ७० महिला मतदारांनी मतदान केले. ग्रामीण भागातील कन्नड, गंगापूर विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला, तर वैजापूरमध्ये घसरला.  शहरी भागात पूर्व मतदारसंघात मतदान कमी झाले. 
२०१९ सालच्या लोकसभेसाठी २३ एप्रिल रोजी झालेले मतदान 
मतदारसंघ    झालेले मतदान    आकड्यात 
कन्नड    ६४.८० टक्के    २ लाख २ हजार २३
औरंगाबाद मध्य    ६२.१९ टक्के    १ लाख ९८ हजार ७८५
औरंगाबाद पश्चिम    ६२.७८ टक्के    २ लाख ७ हजार ८२९
औरंगाबाद पूर्व    ६२.८० टक्के    १ लाख ९२ हजार १९९
गंगापूर    ६५.८९ टक्के    २ लाख ३ हजार ६२४
वैजापूर    ६२.०७ टक्के    १ लाख ९० हजार ७८२
एकूण    ६३.४१ टक्के    ११ लाख ९५६ हजार २४२

ग्रामीण भागात मतदान वाढले
कन्नड, गंगापूर आणि वैजापूर या तिन्ही ग्रामीण आणि निमशहरी मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढले आहे.

कन्नड 
२0१४ - १,७१,६२१
२0१९ - २,0२,0२३

गंगापूर 
२0१४ - १,६०,४०९
२0१९ - २,0३,६२४

वैजापूर
२0१४ - १,५६,२००
२0१९ - १,९०,७८२

औरंगाबाद मध्य
२0१४ - १,६३,५४३
२0१९ - १,९८,७८५

औरंगाबाद पश्चिम
२0१४ - १,६९,0८५
२0१९ - २,0७,८२९

औरंगाबाद पूर्व
२0१४ - १,५५२५२
२0१९ - १,९२,१९९

Web Title: Lok Sabha Election 2019: Aurangabad does not have to increase the percentage of votes required for the Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.