शिर्डी लोकसभा निवडणूक निकाल 2019: निळवंडे कालव्याने विजयाचा मार्ग सुकर : सदाशिव लोखंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 04:00 PM2019-05-24T16:00:23+5:302019-05-24T16:00:27+5:30

shirdi Lok Sabha Election Results 2019

Shirdi Lok Sabha electionults 2019: way of Nilvande canal easy : winner Sadashiv Lokhande | शिर्डी लोकसभा निवडणूक निकाल 2019: निळवंडे कालव्याने विजयाचा मार्ग सुकर : सदाशिव लोखंडे

शिर्डी लोकसभा निवडणूक निकाल 2019: निळवंडे कालव्याने विजयाचा मार्ग सुकर : सदाशिव लोखंडे

googlenewsNext

शिवाजी पवार
अहमदनगर : निळवंडे धरणासाठी केंद्र सरकारने दिलेला निधी, त्यामुळे निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांनी दिलेली साथ, विकास कामांसाठीचा पाठपुरावा या बळावर जनतेचे दुसऱ्यांदा निवडून दिले. विरोधकांनी अपप्रचार केला, मात्र जनतेनेच त्यांना उत्तर दिले, असे नवनिर्वाचित खासदार सदाशिव लोखंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
..तुमच्या विजयाचे श्रेय कोणाला देणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मी मनापासून आभारी आहे. त्यांनी निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामांना २ हजार २०० कोटी रुपये निधी मंजूर केला. यामुळे माझ्या विजयात मोठा हातभार लागला. मतदारसंघात निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील १६५ गावे आहेत. या सर्व गावांमध्ये मला ८० टक्क्याहून अधिक मते मिळाली. तेथील आघाडी ही निर्णायक राहिली. या भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न आहे. तो सफल होईल अशी अपेक्षा आहे.
मतदारसंघात केलेल्या कामांना जनतेने कौल दिला का?
निश्चितच आपण केलेल्या कामांना जनतेने मतांच्या रुपाने पसंती दिली. आठ ठिकाणी मंजूर केलेल्या कृषी प्रोड्यूसर कंपन्या, श्रीरामपूरमध्ये सुरू केलेले पासपोर्ट कार्यालय ही कामे जनतेसमोर होती. पुढील काळात समुद्रात वाहून जाणारे पाणी वळविण्याचा आपला प्रयत्न आहे. नगर-नाशिक व मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न त्यामुळे कायमचा निकाली निघणार आहे. मतदारसंघातील टेलच्या भागापर्यंत मी पाणी पोहोचविणार आहे. त्यामुळे शेतकºयांना न्याय मिळेल.

 

Web Title: Shirdi Lok Sabha electionults 2019: way of Nilvande canal easy : winner Sadashiv Lokhande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.