गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू, कुटुंबावर शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2022 11:40 IST2022-09-10T11:18:59+5:302022-09-10T11:40:01+5:30
विसर्जनानंतर सोबतचे लोक परत आले. परंतु सोपान व गोकुळ दोघेही त्यांच्यासोबत परतले नाहीत.

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू, कुटुंबावर शोककळा
हरिओमसिंह बघेल
आर्णी (यवतमाळ) : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना महागाव येथे ९ सप्टेंबरला संध्याकाळी ६:३० च्या सुमारास घडली. सोपान बबन गावंडे (१६) व गोकुळ दत्ता टेटर (१६) दोघेही, महागाव, ता. दीग्रस येथील रहिवासी आहेत.
हे दोघेही काल सायंकाळी गणपती विसर्जनासाठी महागाव नजीकच्या नाल्यात गेले होते. विसर्जनानंतर सोबतचे लोक परत आले. परंतु सोपान व गोकुळ दोघेही त्यांच्यासोबत परतले नाहीत. तेव्हा गावकरी व नातेवाईक शोध घेण्यासाठी नाल्यावर गेले असता दोघेही पाण्यात आढळून आले.
त्यांना ऊपचारासाठी तत्काळ आर्णी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, सोपान गावंडेचा उपचारादरम्यान आर्णीतच मृत्यू झाला तर गोकुळला पुढील उपचारासाठी यवतमाळ पाठवण्यात आले परंतु, त्याचाही मृत्यू झाला. याप्रकरणी मृतक सोपान गावंडेच्या काकाने आर्णी पोलिसात तक्रार दिली आहे. दोघांच्या मृत्यून कुटुंबियांवर मोठे आभाळ कोसळले आहे.