Maharashtra Election 2019 ; प्रक्रिया उद्योगासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 06:00 AM2019-10-19T06:00:00+5:302019-10-19T06:00:12+5:30

काश्मिर हे देशाचं अभिन्न अंग आहे. त्यामुळे काश्मिरसह देशाची सुरक्षा मोदी सरकारला नेहमीच महत्वाची राहिली. जेव्हा-जेव्हा पाकिस्तानने कुरघोड्या केल्या तेव्हा-तेव्हा पाकिस्तानला ठेचण्याचे काम मोदी सरकारने केले, असे प्रतिपादन त्यांनी केले. काँग्रेसच्या काळात पाकिस्तानकडून नेहमीच घुसखोरी होत होती. मात्र तत्कालिन पंतप्रधानांनी केवळ पाकिस्तानचे लाड पुरविण्याचे काम केले.

Maharashtra Election 2019 ; Will try for the process industry | Maharashtra Election 2019 ; प्रक्रिया उद्योगासाठी प्रयत्न करणार

Maharashtra Election 2019 ; प्रक्रिया उद्योगासाठी प्रयत्न करणार

Next
ठळक मुद्देअमित शहा : वणीत प्रचारसभा, पाकिस्तानला धडा शिकवत राहू

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : यवतमाळ हा कापूस आणि सोयाबीन उत्पादक जिल्हा आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कापूस आणि सोयाबीन प्रक्रिया हाऊस तयार करण्यास मोदी सरकार बांधिल असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी दिली.
स्थानिक शासकीय मैदानावर प्रचारसभेत ते बोलत होते. अमित शहा यांनी मोदी सरकारच्या काळात केलेला विकासाचा लेखाजाखा यावेळी मांडला. देशातील १३ कोटी गरिब महिलांना गॅस कनेक्शन देऊन माताभगिनींना धूरमुक्त करण्याचे काम मोदी सरकारने केले. १० कोटी घरांमध्ये शौचालये बांधली. मात्र शरद पवारांनी या योजनेवर टिका केल्याचे सांगून पवारांना महिलांच दु:ख कळतं का, असा सवाल शहा यांनी उपस्थित केला.
काश्मिर हे देशाचं अभिन्न अंग आहे. त्यामुळे काश्मिरसह देशाची सुरक्षा मोदी सरकारला नेहमीच महत्वाची राहिली. जेव्हा-जेव्हा पाकिस्तानने कुरघोड्या केल्या तेव्हा-तेव्हा पाकिस्तानला ठेचण्याचे काम मोदी सरकारने केले, असे प्रतिपादन त्यांनी केले.
काँग्रेसच्या काळात पाकिस्तानकडून नेहमीच घुसखोरी होत होती. मात्र तत्कालिन पंतप्रधानांनी केवळ पाकिस्तानचे लाड पुरविण्याचे काम केले. मात्र मोदी सरकारने पाकिस्तानची घुसखोरी व हल्ल्यांना चोख उत्तर दिले. वेळप्रसंगी पाकिस्तानमध्ये घुसून ठोकून काढले. याहीपुढे मोदी सरकार पाकिस्तानला धडा शिकवत राहिल, असा विश्वास अमित शहा यांनी यावेळी दिला.
मंचावर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शिवसेनेचे किशोर तिवारी, वणीचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार, वरोराचे संजय देवतळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिनकर पावडे, राजेंद्र डांगे, शिवसेना नेते गणपत लेडांगे, रवी बेलुरकर, विजय चोरडीया, अभिनव भास्करवार, रिपाइंचे वर्सुकेत पाटील, राम झिले आदी उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Will try for the process industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.