Maharashtra Election 2019 ; अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची आज जाहीर सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST2019-10-17T06:00:00+5:302019-10-17T06:00:09+5:30
सिन्हा यांच्यासोबत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार विजय दर्डा, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.वजाहत मिर्झा, माजी आमदार कीर्ती गांधी, संध्याताई सव्वालाखे व अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra Election 2019 ; अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची आज जाहीर सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रसिद्ध सिने अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा गुरूवार, १७ आॅक्टोबर रोजी दुपारी २ वाजता यवतमाळ शहरात काँग्रेस उमेदवार अनिल ऊर्फ बाळासाहेब मांगूळकर यांच्या प्रचारासाठी येणार आहे. यावेळी त्यांचीे धामणगाव रोडवरील शिवशक्ती लॉनमध्ये दुपारी २ वाजता जाहीर सभा होेणार आहे.
सिन्हा यांच्यासोबत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार विजय दर्डा, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.वजाहत मिर्झा, माजी आमदार कीर्ती गांधी, संध्याताई सव्वालाखे व अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यवतमाळकर जनतेने आपल्या लाडक्या ‘शॉटगन’ला ऐकण्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी केले आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात या निवडणूकीत मोठ्या स्टार प्रचारकाची ही पहिलीच जाहीर सभा होत आहे.