Next

Video : खाकी वर्दीतला कलाकार! १५ ऑगस्टनिमित्त शहिदांना अनोखी श्रद्धांजली 

By पूनम अपराज | Published: August 9, 2019 09:43 PM2019-08-09T21:43:28+5:302019-08-09T21:45:18+5:30

अभिनेता अक्षय कुमारच्या मुख्य भूमिकेत असलेल्या केसरी या सिनेमातील 'तेरी मिठ्ठी' हे गाणं तायडे यांनी गायलं आहे. 

ठळक मुद्दे खाकी वर्दीतील कलाकार संघपाल तायडे येत्या १५ ऑगस्टनिमित्त एक देशभक्तीपर गीत घेऊन येत आहे. कालच हे गाणं यु ट्यूबवर अपलोड करण्यात आलं असल्याचं तायडे यांनी सांगितलं. 

मुंबई - जळगाव येथील वाहतूक विभागात पोलीस नाईक म्हणून नोकरी करणारे संघपाल तायडे यांनी सुरेल गाणं गाऊन १५ ऑगस्टनिमित्त शहीद सैनिक आणि पोलिसांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. खाकी वर्दीतील कलाकार संघपाल तायडे येत्या १५ ऑगस्टनिमित्त एक देशभक्तीपर गीत घेऊन येत आहे. अभिनेता अक्षय कुमारच्या मुख्य भूमिकेत असलेल्या केसरी या सिनेमातील 'तेरी मिठ्ठी' हे गाणं तायडे यांनी गायलं आहे. पोलीस नाईक संघपाल तायडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं की, मी जळगाव येथे वाहतूक विभागात कार्यरत असून केसरीमधलं मेरी मिठ्ठी हे गाणं मला ऐकल्या - ऐकल्या खूप आवडलं. अतिशय भावनिक वाटलं, २६/११ मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली. तेव्हाच हे गाणं गायचं ठरविलं. माझा मित्र सुनील सूर्यवंशी यांनी यासाठी मेहनत घेतली. हे गाणं मी १० ते १२ वेळा ऐकलं आणि गायलो. गाणं एडिट करण्यास ४ ते ५ दिवस लागले. अंगावर शहारा आणणारं हे गाणं माझ्या शहीद सैनिक आणि पोलीस बांधवांसाठी श्रद्धांजली म्हणून गेलो. कालच हे गाणं यु ट्यूबवर अपलोड करण्यात आलं असल्याचं तायडे यांनी सांगितलं.