Next

तरीही हरली चेन्नईची टीम! CSK loses 3rd IPL Match | SRH VS CSK

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 02:19 PM2020-10-03T14:19:25+5:302020-10-03T14:20:10+5:30

उद्योन्मुख फलंदाज प्रियम गर्ग व अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्मा यांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाने महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला मोसमातील लागोपाठ तिस-या पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना प्रियम गर्गच्या तुफानी अर्धषतकाच्या बळावर २० षटकांत पाच बाद १६४ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात फारच निराशाजनक झाली. सलामीवीर शेन वॉटसन, फॅफ ड्यू प्लेसिस, अंबाती रायडू व केदार जाधव हे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर कर्णधार महेंद्र सिंग धोनी व रविंद्र जडेजा या दोघांनी सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत संघाला विजयाचा मार्गावर नेण्यास सुरुवात केली. पण मोक्याच्या क्षणी जडेजा बाद झाला. त्यानंतर धोनीने संघाला विजय मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांना अवघ्या सात धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्ससनरायझर्स हैदराबादआयपीएलआंतरराष्ट्रीय क्रिकेटIPL 2020Chennai Super KingsSunrisers HyderabadIPLInternational cricket