Next

IPL 2021 Postponed : स्पर्धेचा दुसरा टप्पा कधी?When is the 2nd round of the competition? Sports News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 04:10 PM2021-05-04T16:10:33+5:302021-05-04T16:11:25+5:30

कोरोनाने देशभरात थैमान घातलंय. कोरोनावर नियंत्रण मिळवणं सध्या तरी कठिण झालंय. आता कोरोनाचा फटका आयपीएलला सुद्धा बसलाय. अनिश्तित काळासाठी आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. बायो-बबलची सुरक्षा भेदून कोरोनाने आयपीएलमध्ये शिरकाव केला. अनेक खेळाडूंसह काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने स्पर्धा संकटात सापडली होती. कोरोना प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केलं. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आयपीएल स्पर्धा स्थगित करत असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धा स्थगित करत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :आयपीएल २०२१आंतरराष्ट्रीय क्रिकेटकोरोना वायरस बातम्याIPLInternational cricketcorona virus