Next

कडकनाथ'च्या प्रेमात धोनी, 2000 कोंबड्याची ऑर्डर | MS Dhoni and kadaknath Chicken | India News

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 12:40 PM2020-11-14T12:40:57+5:302020-11-14T12:42:34+5:30

महेंद्रसिंग धोनी, मोठ्या कष्टाने नाव कमावलेला व्यक्ती म्हणून आपण त्याला ओळखतो. जगभरात त्याचे करोडो चाहते आहेत. तर काही लोक त्याचा रागरागही करतात. पण, पण, त्याच्या निर्णयक्षमतेवर मात्र कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकत नाही. धोनीने घेतलेला निर्णय हा कधी चुकीचा ठरलाय, असं सहसा कधी घडलं नाही. १५ ऑगस्ट २०२० ला धोनीने निवृत्ती घेतली. त्यानंतर धोनी आता पोल्ट्री व्यवसायाकडे वळलाय असं सांगितलं जातंय. धोनी आता कडकनाथ कोंबडीपालन करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्यांला त्याने कडकनाथ कोंबड्याची ऑर्डर दिली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :एम. एस. धोनीशेतीशेती क्षेत्रM. S. DhoniagricultureAgriculture Sector