वाद्य वाजविणाऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू; गणेश विसर्जन मिरवणुकीत घडली घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2023 18:57 IST2023-09-29T18:57:14+5:302023-09-29T18:57:52+5:30
नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

वाद्य वाजविणाऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू; गणेश विसर्जन मिरवणुकीत घडली घटना
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत बेंजो वाजविणाऱ्या तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नालासोपाऱ्याच्या समेळपाडा येथे गुरुवारी रात्री घडली आहे. नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
निळेगाव येथील सायकृपा अपार्टमेंटमध्ये राहणारा संजय भाऊराव साने (२९) व त्यांचे बेंजो पथक समेळ पाडा येथील मंडळाच्या अकरा दिवसांच्या गणेश विसर्जनाची ऑर्डर घेतली होती. गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास लिटिल फ्लॉवर शाळेजवळ मिरवणूक असताना संजय याला चक्कर आल्याने त्याला मनपाच्या सोपारा रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.