प्रदूषणामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली 'चिमणी' पुन्हा अंगणात परतणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 17:52 IST2025-03-20T17:51:15+5:302025-03-20T17:52:22+5:30

जागतिक चिमणी दिवस : चला चिऊताईला वाचवूया

Will the 'sparrow', which is on the verge of extinction due to pollution, return to the yard? | प्रदूषणामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली 'चिमणी' पुन्हा अंगणात परतणार का?

Will the 'sparrow', which is on the verge of extinction due to pollution, return to the yard?

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
काही वर्षापूर्वी शाळेत असताना भिंतींना टांगलेला खोपा, त्यात बागडणारी चिऊताई आज कुठेतरी हरवली आहे. अंगणात दाणे टिपणाऱ्या चिऊताईचे आज दिवसेंदिवस दर्शन दुर्मीळ होत चालले आहे. आपल्या शाळेच्या पुस्तकातील चिऊताई कुठे हरवली, याचा विचार आज प्रत्येकाने करण्याची गरज आहे. २०१० साली २० मार्चला हा पहिल्यांदा साजरा करण्यात आला, त्यानंतर तो प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येत आहे.


का घटतेय संख्या ?
टेलिकॉम टॉवरच्या रेडिएशनमुळे चिमण्यांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होतो, असे संशोधन आहे. जुन्या इमारती, वाडे, घरे नाहीशी झाली. काही दशकांत अन्नासाठी चिमणीसोबत भोवरी, मैना, पारवा या पक्ष्यांची स्पर्धा वाढली असून, ते प्रबळ ठरत आहे. मोठी शहरे सोडून चिमण्यांनी मुक्काम लहान शहर किंवा गावाकडे वळविला आहे.


चिमण्यांसाठी लावली चार ते पाच घरटी
केळकरवाडी येथील राहूल वकारे व हिमालय विश्व येथे राहणारे विनोद साळवे या दोघांनीही त्यांच्या घरी चिमण्यांसाठी ४ ते ५ घरटी लावली आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. वर्षभर चिमण्या घरट्यांचा विणीच्या हंगामात स्वीकार करतात. यात किमान २५ नवीन पिल्लांचा जन्म होतो. यामुळे परिसरातील किटकांवर नियंत्रण ठेवण्याचे काम आपसूकच होते. त्यामुळे प्रत्येकानेच आपआपल्या घरात चिमण्यांसाठी घरटी तयार करण्याची आवश्यकता आहे. 


पिकांच्या संरक्षणासाठी बजावते महत्त्वाची भूमिका
चिमण्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्या इको सिस्टिम आणि अन्नसाखळीतील महत्त्वाचा भाग आहे. किडींपासून संरक्षण करण्यासाठी चिमणी महत्त्वाची भूमिका बजावते. पीक काढणीला आल्यावर चिमण्या दाणे खातात, यात शेतकरी धान्य त्यांना सोडून देतो. 


"चिमण्यांसाठी लाकडाचे घरटे घरावर, बगीच्यात सोसायटीच्या पाकिंगमध्ये, पुलाखाली व जिथे चिमण्या घरटे स्वीकारू शकेल, अशा प्रत्येक ठिकाणी लावावे. त्यांच्यासाठी नेहमी पिण्यासाठी व आंघोळीसाठी मातीच्या पसरट भांड्यात स्वच्छ पाणी ठेवावे. कचरा व प्लास्टिक जाळल्याने प्रदूषणात वाढ होईल, त्यामुळे हे टाळावे. त्यांच्यासाठी स्थानिक व निवाऱ्यासाठी आवश्यक असलेली झाडे लावावी."
- राहुल वकारे, विदर्भ समन्वयक, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना

Web Title: Will the 'sparrow', which is on the verge of extinction due to pollution, return to the yard?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा