शिंदेंच्या हेलिकॉप्टरचा थरारक किस्सा; वर्ध्यात पोहचुनही हेलिकॉप्टर उतरले नाही

By शुभांगी काळमेघ | Updated: July 22, 2025 19:00 IST2025-07-22T18:56:53+5:302025-07-22T19:00:39+5:30

Wardha : वर्ध्यात मुसळधार पाऊस, शिंदेंचं हेलिकॉप्टर माघारी

The thrilling story of Shinde's helicopter; The helicopter did not land even after reaching Wardha. | शिंदेंच्या हेलिकॉप्टरचा थरारक किस्सा; वर्ध्यात पोहचुनही हेलिकॉप्टर उतरले नाही

Shinde's helicopter did not land even after reaching Wardha.. Reached Wardha again via Samruddhi

वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठेवण्यात आलेल्या मोतीबिंदूमुक्त शिबिराच्या कार्यक्रमांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने येत असतांनाच मुसळधार पाऊस सुरु झाला त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला हेलिपॅडच न दिसल्याने शिंदेंना माघारी घेत नागपूर येथे जाऊन हेलिकॉप्टर लॅन्ड करून पुन्हा बाय रोड समृद्धी महामार्गाने गाडीने परत वर्ध्याला येणे पडले. 


पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सेवाग्राम येथील चरखा सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रकाश आबिटकर आणि मंत्री संजय राठोड उपस्थित होते. दुपारी १२ वाजता आयोजित केलेला हा कार्यक्रम पावसामुळे अडीच तास उशिरा सुरु करण्यात आला. 


उपमुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरवातीलाच त्यांना झालेल्या उशिराने कारण सांगत म्हणाले, अरे "मी आताच दोनदा येऊन हॅलो केले. निघतांना पावसास सुरवात झाली. कार्यक्रमस्थळी येताच पाऊस जोरात. हेलिपॅड दिसेना. गोंधळ झाला. पायलट म्हणाला आता उतरणे कठीणच. खाली काही दिसत नाही. परत फिरावे लागणार. मी त्याला धीर देत म्हणालो प्रयत्न तर करून बघ त्यावर पायलट म्हणाला प्रयत्न अंगलट येऊ शकतो." त्यामुळे कार्यक्रमापेक्षा शिंदेंना दोनदा घडलेल्या वर्धा भेटीचीच जास्त चर्चा रंगली. 

Web Title: The thrilling story of Shinde's helicopter; The helicopter did not land even after reaching Wardha.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.