मोठ्या पुलाजवळ आढळला मृतदेह; घटना बुधवारी दुपारी उघडकीस
By रवींद्र चांदेकर | Updated: September 4, 2024 18:11 IST2024-09-04T18:10:39+5:302024-09-04T18:11:02+5:30
Wardha : अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही

The body was found near the big bridge
वर्धा : पुलगाव येथे औरंगाबाद ते नागपूर मार्गावरील वर्धा नदीच्या मोठ्या पुलाजवळ एक पुरुष मृतदेह आढळला. ही घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही.
वर्धा नदीवर बांधलेल्या छोट्या पुलावरून पुलगावहून विटाळा गावाकडे जात असताना पुलावरील खड्डे चुकविताना दुचाकी स्लीप होऊन दुचाकीसह महिला व पुरुष वाहून गेले होते. ही घटना सोमवारी सकाळी १०:१५ वाजताच्या सुमारास घडली होती. पुलावर आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. हे खड्डे चुकविताना महिला व पुरुष वाहून गेले होते. दोघांचा शोध घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांची चमू तेथे कार्यरत आहे. त्यांना बुधवारी पुरुष मृतदेह आढळला. मात्र. मृताची अद्याप ओळख पटली नव्हती.