दुचाकी अनियंत्रित होत पुलाखाली गेली अन् दुचाकीसह दोघे वर्धा नदीत गेले वाहून
By रवींद्र चांदेकर | Updated: September 2, 2024 13:13 IST2024-09-02T13:05:02+5:302024-09-02T13:13:18+5:30
Wardha : वर्धा नदीच्या लहान पुलावर दोघे गेले वाहून

The bike went out of control and went under the bridge and the two were swept into the Wardha River along with the bike
वर्धा : दुचाकी अनियंत्रित होत पुलाखाली गेली अन् दुचाकीसह दोघे वर्धा नदीत गेले वाहून. ही घटना सोमवारी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास पुलगाव येथे घडली. पुलगाव येथून विटाळा येथे दुचाकीने महिला व पुरुष जात होते. पुलगाव येथील वर्धा नदीच्या लहान पुलावर दुचाकीने जात असताना दुचाकी अनियंत्रित होत थेट पुलाखाली गेली.
सततच्या पावसाने व धारणातील पाण्याचा विसर्ग असल्याने नदी दुभडी भरून वाहत आहे. अशातच नदीच्या प्रवाहात महिला व पुरुष वाहून गेले. महिला व पुरुष वाहून जातं असल्याचे उपस्थित नागरिकांनी पाहीले. वर्धा नदीवरील हा पूल मागील वर्षांपासुन वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र तरीही नागरिक यावरून प्रवास करतात. पुलावर मोठे खड्डे पडले असल्याने हा अपघात घडला. घटनास्थळी पोलिसांसह महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले आहे. वर्धेतून आपत्ती व्यवस्थापन पथकही दाखल झाले आहे. अद्याप कोण वाहून गेलंय याची ओळख पटली नाही.