Maharashtra Election 2019 ; मोबाईल जामरच्या मागणीसाठी अपक्ष उमेदवाराची वीरुगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST2019-10-24T06:00:00+5:302019-10-24T06:00:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : यंदा विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून राजकीय भविष्य आजमावत असलेल्या उमेदवार श्याम भास्कर इडपवार यांनी ...

Maharashtra Election 2019 ; मोबाईल जामरच्या मागणीसाठी अपक्ष उमेदवाराची वीरुगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : यंदा विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून राजकीय भविष्य आजमावत असलेल्या उमेदवार श्याम भास्कर इडपवार यांनी मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल जामर लावण्याची मागणी बुधवारी रेटली. इडपवार यांनी पाण्याच्या टाकीवर चढून सदर मागणी रेटल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. आंदोलनादरम्यान श्याम इडपवार यांनी सदर मागणीचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांना सादर केले. हे आंदोलन तहसील कार्यालयाच्या आवारात करण्यात आले.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत एका उमेदवाराला लाख मते तर इतर सर्व मित्राची उमेदवाराची अनामत जप्त अशीस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मतमोजणीदररम्यान पारदर्शकता रहावी या हेतूने मतमोजणीच्या परिसरात मोबाईल जामर बसविण्यात यावे, अशी मागणी यावेळी श्याम इडपवार यांनी याप्रसंगी केली. बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान श्याम इडपवार यांनी तहसील पाण्याच्या टाकीवर चढून आपली मागणी रेटत त्याकडे नागरिकांसह शासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. सदर आंदोलनाची माहिती मिळताच ठाणेदार सत्यवीत बंडीवार यांनी आंदोलनस्थळ गाठून भ्रमणध्वनीच्या सहाय्याने इडपवार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. शिवाय पाण्याच्या टाकीवरून खाली उतरण्याचे आवाहन केले. त्यानंतर इडपवार यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खाली उतरून मागणीचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले. सदर आंदोलनकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेत समज देऊन सोडून दिल्याचे सांगण्यात येते. एकूणच या आंदोलनामुळे परिसरात आणि तहसील कार्यालयातील अधिकाºयांची तसेच पोलीस अधिकाºयांसह कर्मचाºयांची एकच तारंबळ उडाली होती.