Maharashtra Election 2019 : जिल्ह्यात ४७ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 05:00 IST2019-10-08T05:00:00+5:302019-10-08T05:00:14+5:30

देवळी विधानसभा मतदार संघात एकूण १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या मतदार संघात आता १४ उमेदवार निवडणुक लढणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये राजेंद्र गुलाबराव बानमारे, ज्ञानेश्वर गोविंदराव ढगे, रमेश ज्ञानेश्वर टिपले, अजय बाबाराव तिजारे, सुरेश गणपतराव नगराळे यांचा समावेश आहे.

Maharashtra Election 2019 : 47 candidates are in the Ring the district | Maharashtra Election 2019 : जिल्ह्यात ४७ उमेदवार रिंगणात

Maharashtra Election 2019 : जिल्ह्यात ४७ उमेदवार रिंगणात

ठळक मुद्देहिंगणघाटात चार, देवळीत पाच जणांची माघार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात दोन विधानसभा मतदारसंघातच ९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता ४ मतदार संघात ४७ उमेदवार मैदानात राहिले आहे. हिंगणघाटमध्ये १३ तर देवळी मतदार संघात १४ आणि आर्वी व वर्धा मतदार संघात प्रत्येकी १० उमेदवार नशीब अजमावणार आहे.
देवळी विधानसभा मतदार संघात एकूण १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या मतदार संघात आता १४ उमेदवार निवडणुक लढणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये राजेंद्र गुलाबराव बानमारे, ज्ञानेश्वर गोविंदराव ढगे, रमेश ज्ञानेश्वर टिपले, अजय बाबाराव तिजारे, सुरेश गणपतराव नगराळे यांचा समावेश आहे.
या मतदार संघात भाजपचे बंडखोर म्हणून राजेश बकाणे यांचा उमेदवारी अर्ज कायम आहे. हिंगणघाट मतदार संघात एकूण १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ४ उमेदवारांनी रिंगणात माघार घेतली आहे. त्यामुळे या मतदार संघात १३ उमेदवार मैदानात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणाºया प्रमुख उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बंडखोर उमेदवार हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, लोक जागर पक्षाचे मनिष पांडुरंग नांदे, अपक्ष हेमंत इसनकर, प्रशांत रामचंद्र पवार यांचा समावेश आहे. या मतदार संघात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे. वर्धा व आर्वी मतदार संघात प्रत्येकी १० उमेदवार रिंगणात असून एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही.

Web Title: Maharashtra Election 2019 : 47 candidates are in the Ring the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा