आरोग्य यंत्रणा सलाईनवर रिक्त पदांचे ग्रहण सुटेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 17:56 IST2025-03-21T17:54:32+5:302025-03-21T17:56:15+5:30
Vardha : आरोग्य यंत्रणेत रिक्तपदे असल्याने ग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे दिसते.

Health system continues to face shortage of vacant posts
पुरूषोत्तम नागपूरे
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : तालुक्यातील एकूण तीन प्रमुख आरोग्य केंद्र तसेच २३ उपकेंद्र आणि दोन ऍलोपॅथी रुग्णालयासह आयुर्वेदिक रुग्णालय तसेच जळगाव, रोहणा, खरांगणा, निंबोली, वाठोडा येथे तब्बल २३ पदे रिक्त आहेत. जळगाव येथे चार अटेंडंट, तीन सेक्युरिटी गार्ड, एक समुदाय आरोग्य अधिकारी तसेच खरांगणा येथे दोन अटेंडंट तीन सेक्युरिटी गार्ड व एक समुदाय आरोग्य अधिकारी तसेच रोहणा येथे एक अटेंडंट तीन सेक्युरिटी गार्ड व एक समुदाय अधिकारी त्याचप्रमाणे निंबोली येथे एक अटेंडंट व वाठोडा येथे एक अटेंडंट अशा एकूण २३ कर्मचाऱ्यांची कमी आहे. याकडे लक्ष देत ही पदे तत्काळ भरावी, अशी मागणी केली जात आहे. रिक्तपदांमुळे रुग्णांची देखील हेळसांड होत असल्याचे चित्र आहे. याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
शेकडो रुग्ण रेफर
आरोग्य केंद्रात सर्वच औषधी उपलब्ध आहे. गरोदर माताची प्रसूती ही आरोग्य केंद्रातच केली जात आहे. मात्र अडचण असल्यास रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय आवीं येथे रेफर केले जाते. एका आरोग्य केंद्रातून जवळपास २५ ते ३० असे एकूण महिन्याकाठी अंदाजे प्रसूतीचे ६५ ते ९५ रुग्ण रेफर केले जात असल्याची बाब निदर्शनास आली.
"माझ्याकडे आर्वी तालुका आरोग्य अधिकारी व जळगाव येथील वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यभार आहे. जळगाव, खरांगणा, रोहणा, - तसेच निंबोली, वाठोडा येथील एकूण २३ पदे रिक्त आहेत."
- डॉ. नीलेश वर्मा, वैद्यकीय अधिकारी जळगाव.