१०० रुपयांत वर्षभर दारू प्या! पाच महिन्यांत ४३६ जणांनी काढले दारू पिण्याचे लायसेन्स !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 20:22 IST2025-06-23T20:22:26+5:302025-06-23T20:22:57+5:30
Wardha : उत्पादन शुल्क विभागाला ३९ हजार रुपयांचा महसूल झाला प्राप्त

Drink alcohol for a year for Rs 100! 436 people got liquor licenses in five months!
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा जिल्हा दारूबंदी आहे. मात्र, तरीही जिल्ह्यालगतच्या वाईन शॉपवर दिवसभर मुंग्यांसारखी गर्दी असते. प्रत्यक्षात, परवाना काढून 'लिमिट' मध्ये दारू पिणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाला महसूल कमी मिळतो. दारू पिण्यासाठी दारूबंदी जिल्ह्यात लायसेन्स काढणाऱ्यांची आकडेवारी पाहिल्यास जिल्ह्यात जानेवारी ते मेदरम्यान पाच महिन्यांत ४३६ जणांनी दारूसेवनाचे परवाने काढले. याशिवाय वर्षभर दारू पिण्याचा आणि एक दिवसाचा परवाना काढणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. दारू खरेदी करणाऱ्यांपैकी ९० टक्के नागरिकांकडे परवानाच नसतो.
परवाना काढल्यावरही या अटींचे पालन आवश्यक
परवाना मिळाल्यानंतर, ज्या परवान्यासाठी अर्ज केला आहे, त्या संबंधित सर्व नियम आणि अटींचे पालन करणे आवश्यक आहे. परवान्याची वैधता संपण्यापूर्वी, त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. जर परवान्याच्या अटींमध्ये काही बदल झाले, तर ते बदल स्वीकारणे आणि त्यानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे.
मद्य परवानाधारकांनाही सवलत
मद्य परवानाधारकांना खरेदी-विक्री करताना काही सवलती मिळतात. तसे पाहता जिल्ह्यात दारू खरेदी करणाऱ्या २० टक्के लोकांकडे परवाना नसतोच.
कोणाकडून दिला जातो मद्य परवाना ?
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://exciseservices.mahaonlin e.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. त्या ठिकाणी सर्व्हिसेसची यादी दिसेल, त्यावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला कुठला परवाना पाहिजे, ते निवडून त्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करायचा आहे. डिजिटल फोटो आणि सही, ओळखपत्र (आधार कार्ड, व्होटर आयडी), रहिवासी दाखला आवश्यक असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.
१०० रूपयांत वर्षभर दारू पिण्याचा परवाना
महाराष्ट्रात दारू पिण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना घ्यावा लागतो. एक दिवसाचा ५ रुपये, वर्षाचा १०० रुपये, तर आजीवन परवाना एक हजार रुपयांमध्ये मिळतो. परवाना नसल्यास, दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते. पहिल्या गुन्ह्यासाठी तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.
किती वर्षांवरील व्यक्तींना मिळतो परवाना
वर्षभर दारू पिण्याचा आणि एक दिवसाचा परवाना काढणाऱ्यांची संख्या सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये दारू पिण्यासाठी कायदेशीर वय २५ वर्षे आहे. याचा अर्थ असा की, २५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींनाच दारू पिण्याचा परवाना मिळतो. वयाची २१ वर्षे पूर्ण केली असतील तर बिअर किंवा ब्रिझरचे सेवन करण्याचा परवाना मिळतो.
दारूच्या परवान्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र हवे
परवाना एका दिवसाचा, एका वर्षाचा किंवा आयुष्यभराचाही असू शकतो. तो मिळवण्यासाठी वैद्यकीय अहवालाची आवश्यकता असते. शरीराला मद्यसेवनाची गरज असल्याचा दाखला डॉक्टरांनी दिला असेल, तर परवाना दिला जातो.