उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राम आश्रमला भेट, महात्मा गांधींना अभिवादन
By अभिनय खोपडे | Updated: October 2, 2023 13:31 IST2023-10-02T13:30:18+5:302023-10-02T13:31:04+5:30
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्रमातील प्रार्थना सभेत सहभाग घेतला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राम आश्रमला भेट, महात्मा गांधींना अभिवादन
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य राहिलेल्या सेवाग्राम आश्रमला भेट दिली व गांधीजींना अभिवादन केले.
यावेळी खासदार रामदास तडस, आ.चंद्रशेखर बावनकुळे, आ.रामदास आंबटकर, आ.डॉ.पंकज भोयर, आ.दादाराव केचे, माजी आमदार आशिष देशमुख, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक नूरुल हसन उपस्थित होते. उपस्थितांनीही महात्मा गांधीच्या स्मृतींना अभिवादन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्रमातील प्रार्थना सभेत सहभाग घेतला तसेच आश्रमातील अभिप्राय नोंदवहीत अभिप्रायदेखील नोंदविला.