उल्हासनगरमधील विकास कामासाठी तिन्ही आमदार एकत्र, आयुक्तांसोबत केली चर्चा
By सदानंद नाईक | Updated: December 10, 2024 20:04 IST2024-12-10T20:04:01+5:302024-12-10T20:04:36+5:30
Ulhasnagar News: उल्हासनगर शहर विकासाच्या कामाला गती देण्यासाठी आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर, सुलभा गायकवाड यांनी पदाधिकाऱ्या सोबत आयुक्त विकास ढाकणे यांच्याशी चर्चा केली. यावेळी आयुक्तानी शहर विकास कामाची माहिती आमदारांना देऊन त्यांचे म्हणणे एकूण घेतले.

उल्हासनगरमधील विकास कामासाठी तिन्ही आमदार एकत्र, आयुक्तांसोबत केली चर्चा
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहर विकासाच्या कामाला गती देण्यासाठी आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर, सुलभा गायकवाड यांनी पदाधिकाऱ्या सोबत आयुक्त विकास ढाकणे यांच्याशी चर्चा केली. यावेळी आयुक्तानी शहर विकास कामाची माहिती आमदारांना देऊन त्यांचे म्हणणे एकूण घेतले.
उल्हासनगर महापालिका हद्दीत भुयारी गटार, पाणी पुरवठा वितरण योजना, अवैध बांधकामे नियमित करणे, मुख्य ७ रस्त्याच्या कामासह पाणी टंचाई, साफसफाई, कचरायचे ढीग, रस्त्याची दुरावस्था आदी समस्या बाबतचा आढावा घेण्यासाठी आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर, सुलभा गायकवाड यांनी आयुक्त विकास ढाकणे यांची मंगळवारी दुपारी भेट घेतली. यावेळी भाजप व शिंदेसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आयुक्त विकास ढाकणे यांनी आदर्श रस्ते, पाणी टंचाई, आदर्श शाळा, ट्रान्सफॉर्मवर मुक्त रस्ते, पाणी पुरावठा स्रोत योजना, मालमत्ता कर बाबत उपाययोजना आदीची माहिती दिली. तसेच विविध नवीन योजना प्रस्तावाची मागणी केली. आयुक्त विकास ढाकणे यांनी विकास कामाबाबत दिलेल्या माहितीवर आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर, सुलभा गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले.
शहर विकासासाठी विविध प्रस्ताव देण्याची मागणी आमदारांनी आयुक्ताना केली. एकूणच आयुक्तांच्या कामावर तिन्ही आमदारांनी आनंद व्यक्त केला असून शहरविकासासाठी आम्ही आमदार एकत्र असल्याची प्रतिक्रिया किणीकर यांनी दिली. शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह भाजप व शिंदेसेनेचे पदाधिकारी व माजी नगरसेवक यांनी शहरातील समस्या आयुक्ता समोर मांडल्या. आयुक्तांच्या उत्तराने त्यांनीही समाधान व्यक्त केले. एकूणच तिन्ही आमदाराला विकास कामाबाबत आयुक्तानी खुश केल्याचे चित्र महापालिका वर्तुळात होते.