Kalyan-Dombivli: The constituency is neglected in the field | कल्याण-डोंबिवली : मतदारसंघ खेचाखेचीत मैदानांकडे मात्र दुर्लक्ष

कल्याण-डोंबिवली : मतदारसंघ खेचाखेचीत मैदानांकडे मात्र दुर्लक्ष

कल्याण : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. सध्या उमेदवारी देण्यावरून तसेच जागा वाटपावरून स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या वादात प्रचारसभांसाठी मैदाने आरक्षित करण्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. प्रत्यक्षात निवडणुकीच्या प्रचाराला फारच कमी दिवस मिळणार असताना मैदान आरक्षित करण्यासाठी अद्यापपर्यंत एकच अर्ज आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कल्याण परिक्षेत्रात कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली मतदारसंघाचा भाग येतो. लोकसभा, विधानसभा किंवा महापालिकेची निवडणूक असो ती जाहीर होताच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील मैदाने प्रचारासाठी मिळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू होते.

केडीएमसी हद्दीचा आढावा घेता डोंबिवली पश्चिमेत भागशाळा, पूर्वेतील हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुल तर कल्याण पश्चिमेतील सुभाष मैदान, यशवंतराव चव्हाण क्रीडांगण (मॅक्सी ग्राउंड), फडके मैदान तर, पूर्वेकडे दादासाहेब गायकवाड क्रीडांगण, अशी मोठी मैदाने आहेत. यातील सुभाष मैदान आणि मॅक्सी ग्राउंड ही मैदाने फक्त खेळासाठी राखीव आहेत. परंतु, अपवाद म्हणून राष्ट्रीय व्यक्तींच्या सभांसाठी ही मैदाने देण्याबाबत केडीएमसी प्रशासनाकडून निर्णय घेतला जातो.
विधानसभा निवडणुकीचे मतदान २१ आॅक्टोबरला, तर मतमोजणी २४ आॅक्टोबरला होणार आहे. या निवडणुकीसाठी ४ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत.
७ आॅक्टोबरला उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. परंतु, २१ तारखेला मतदान असल्याने १९ तारखेलाच सायंकाळी प्रचार थांबवावा लागणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी अवघे १२ दिवस मिळणार आहेत. त्यानंतरच खºया अर्थाने प्रचाराला सुरुवात होईल.

मैदाने, सभागृहांसाठी नियमावली जाहीर

सभेसाठी मैदाने आरक्षित करण्यासाठी ४८ तास अगोदर अर्ज करणे बंधनकारक राहील. याआधीच अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, सभा अथवा कार्यक्रम संपल्यानंतर दुसºया दिवशी सकाळपर्यंत रिकामे करून देणे बंधनकारक राहील.

एका अर्जदाराला संपूर्ण निवडणूक कालावधीत कुठलेही एक मैदान दोन वेळेस उपलब्ध करून दिले जाईल.
सर्व अर्ज मुख्यालयातील नागरिक सुविधा केंद्रातच स्वीकारले जातील. इतर कुठल्याही विभागात अथवा कार्यालयात अर्ज केल्यास स्वीकारला जाणार नाही.

प्रथम प्राप्त झालेल्या अर्जास प्रथम प्राधान्य देण्यात येईल, दोन अर्जदार अथवा पक्षाने एकाच वेळी एकाच मैदानाची मागणी केल्यास आयुक्तांचा निर्णय अंतिम राहील.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत मैदानांचे भाडे लागू राहील आणि त्यावेळी उपलब्ध करून दिलेली मैदानेच यावेळी दिली

भाजपकडून
एकमेव अर्ज
डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार सभेसाठी भाजपकडून पश्चिमेतील भागशाळा मैदानाची मागणी करण्यात आली आहे. ४ ते ६ आॅक्टोबर, ११ ते १३ आॅक्टोबर आणि १८, १९ आॅक्टोबरला मैदान उपलब्ध व्हावे, असा अर्ज महापालिका मुख्यालयात देण्यात आला आहे.

खाजगी मैदानावरच भिस्त

कल्याण पूर्व मतदारसंघात केडीएमसीचे दादासाहेब गायकवाड क्रीडांगण हे एकमेव मैदान आहे. परंतु, प्रचाराच्या सभेसाठी ते पुरेसे नाही. त्यामुळे तेथील पोटे नामक खाजगी मैदानच प्रचारासाठी वापरता येणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील प्रचारासाठी राजकीय पक्षांना संपूर्णपणे याच मैदानाचा आधार घ्यावा लागणार आहे.

Web Title: Kalyan-Dombivli: The constituency is neglected in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.