अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येलाही विसर्जन घाटावर निर्मल्य पडून
By पंकज पाटील | Updated: September 27, 2023 18:55 IST2023-09-27T18:54:49+5:302023-09-27T18:55:04+5:30
अनंत चतुर्थी अवघ्या काही तासांवर आहे मात्र पालिका प्रशासन विसर्जन कुडांशेजारील स्वछ्तेबाबत उदासीन असल्याचं दिसून येतंय .

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येलाही विसर्जन घाटावर निर्मल्य पडून
अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात विसर्जन घाटांवर अस्वच्छता पसरल्याचे पहावयास मिळत आहे सात दिवसांच्या गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर भाविकांनी निर्मल्य कलशामध्ये टाकलेले निर्मले अजूनही उचलण्यात आलेले नाही. अनंत चतुर्दशी आलेली असताना देखील पालिका प्रशासन स्वच्छता मोहीम राबवत नसल्याने प्रशासनावर कडाडून टीका होत आहे.
अंबरनाथ शहरात गणेशोउत्सव काळात पालिकेकडून ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करून जल प्रदूषण रोखणाचा प्रयत्न करण्यात येतोय,तसेच भाविकांनी आपल्या गणरायाला वाहिलेले हार फुल विसर्जन कुंडात न टाकता पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या निर्माल्य कलशात टाकण्याचं आवाहन करण्यात येतंय . तर भाविक देखील या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत मात्र पालिका प्रशासनचं या निर्माल्यकडेच दुर्लक्ष होत असल्याचं पहायला मिळतंय.
अनंत चतुर्थी अवघ्या काही तासांवर आहे मात्र पालिका प्रशासन विसर्जन कुडांशेजारील स्वछ्तेबाबत उदासीन असल्याचं दिसून येतंय . चिंचपाडा येथील खादानीत गणेश विसर्जनाच्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याच पहायला मिळतंय त्यामुळे पालिकाच स्वछ्तेबाबत उदासीन असल्याचं दिसून येतंय. सात दिवसांच्या गणेश विसर्जन झाल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी निर्मल्य कलश मधील निर्मल्य उचलणे गरजेचे होते. मात्र पालिका प्रशासनाने त्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने आजही हे निर्मल्य आहे त्या स्थितीत पडून आहे.