Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: नेहा आणि यशमधील अंतर वाढणार; परांजपे वकिलांमुळे निर्माण होणार गैरसमज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 19:31 IST

Majhi tujhi reshimgathi: येत्या भागात यश आणि नेहामध्ये गैरसमज निर्माण झाल्याचं पाहायला मिळणार आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे या मालिकेविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यातच यश हळूहळू नेहाच्या प्रेमात पडत असल्यामुळे ही मालिका चांगलीच रंजक वळणावर पोहोचली आहे. मात्र, आता येत्या भागात यश आणि नेहामध्ये गैरसमज निर्माण झाल्याचं पाहायला मिळणार आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये नेहाला फोनवर बोलताना ऐकून यशचा गैरसमज होणार आहे. ज्यामुळे नाराज झालेला यश डबा न खाताच कॅन्टीनमधून निघून जाणार आहे. 

मध्यंतरी बंडू काकांचं मानसिक स्वास्थ बिघडल्यामुळे बंडू काकूंनी नेहाकडून दुसरं लग्न करण्याचं वचन मागितलं होतं. नेहानेदेखील काकूंना तसं वचन दिलं आहे. यामध्ये परांजपे वकील नेहासोबत लग्न करण्यासाठी मुद्दाम तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे दरवेळी परी,यशसाठी लहानशी पोळी करुन नेहासोबत डब्यात पाठवते. मात्र, यावेळी ती पोळी परांजपे वकिलांच्या डब्यात गेल्यामुळे नेहा-यशमध्ये गैरसमज निर्माण होणार आहे.

दरम्यान, नेहा परांजपे वकिलांसोबत बोलत असताना परीने दिलेली पोळी परांजपे वकिलांच्या डब्यात गेल्याचं ऐकल्यावर यश नाराज होतो आणि डबा तिथेच सोडून निघून जातो. त्यामुळे आता या दोघांमधील गैरसमज दूर होईल कि त्यांच्या नात्यातलं अंतर अजून वाढेल हे पाहणं औत्सुक्याचं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनश्रेयस तळपदेटिव्ही कलाकार