Join us
Daily Top 2Weekly Top 5

मन झालं बाजिंद: कृष्णा करणार आत्महत्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 15:05 IST

Man zal bajind: फॅक्ट्रीमध्ये हाताला शॉक लागल्यानंतर कृष्णाचा उजवा हात निकामी होतो. त्यामुळे दैनंदिन जीवनातील लहानमोठी कामं करतांनाही तिला अनेक अडचणी येतात.

छोट्या पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे मन झालं बाजिंद. या मालिकेतील राया आणि कृष्णा या जोडीवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. सध्या ही मालिका रंजक वळणावर असून राया आणि कृष्णाचं नातं दिवसेंदिवस फुलत आहे. परंतु, त्यांची संसार वेल फुलत असताना कृष्णा घर सोडून निघून जाते. इतकंच नाही तर कृष्णाने तिचं जीवन संपवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

फॅक्ट्रीमध्ये हाताला शॉक लागल्यानंतर कृष्णाचा उजवा हात निकामी होतो. त्यामुळे दैनंदिन जीवनातील लहानमोठी कामं करतांनाही तिला अनेक अडचणी येतात. म्हणूनच, तिच्या प्रत्येक कामात तिला राया मदत करतो. परंतु, रायावर सतत अवलंबून रहावं लागत असल्यामुळे कृष्णाने मोठं पाऊल उचललं आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये कृष्णा मध्यरात्री घर सोडून जाते. इतकंच नाही तर ती गावच्या पूलावर उभी राहून नदीत जीव देण्याचा प्रयत्न करते. एकीकडे कृष्णा घरातून अचानक गायब झाल्यामुळे राया कावराबावरा झाला आहे.त्यामुळे तो प्रत्येक ठिकाणी तिचा शोध घेतोय.

दरम्यान, आता राया, कृष्णाचे प्राण वाचवू शकेल का? कृष्णावर ओढावलेलं हे नवं संकट दूर होईल का अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.  

टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजन