मोहिते-पाटील गटाला आणखी एक धक्का; जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख भाजपात
By आप्पासाहेब पाटील | Updated: December 27, 2025 18:10 IST2025-12-27T18:09:34+5:302025-12-27T18:10:06+5:30
जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

मोहिते-पाटील गटाला आणखी एक धक्का; जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख भाजपात
solapur municipal election आप्पासाहेब पाटील, सोलापूर: अकलूजच्या मोहिते-पाटील गटाला शनिवारी मोठा धक्का बसला आहे. मोहिते-पाटील गटातील सर्वात जवळचे व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी शनिवारी भाजपात प्रवेश केला. जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. याच सोहळ्यात ३०० हून अधिक लोकांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी बाेलताना गिरीष महाजन म्हणाले की, भाजपमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओढा खूप मोठा असून कोणीही महाविकास आघाडीकडे जायला तयार नाही. माळशिरस तालुक्यात पश्चिम भागातून बाबाराजे देशमुख यांच्यासारखा तगडा नेता भाजपला मिळाला असून आगामी काळामध्ये माळशिरस तालुक्यात सर्व ठिकाणी भाजपची सत्ता येणार असून त्यासाठी बाबाराजे देशमुख यांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभे राहील, असेही ते म्हणाले, माळशिरस तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व बालेकिल्ले उध्वस्त होत असुन लोकांचा विश्वास भाजपावर आहे. आगामी काळामध्ये संपूर्ण राज्य भाजपमय झाल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माने पाटील, पांडुरंग देशमुख, धैर्यशील देशमुख, नाथाजीराव देशमुख, मालोजीराजे देशमुख, हेमंत देशमुख, हनुमंतराव सूळ, बी. वाय. राऊत, संजय देशमुख, राजेंद्र पांढरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.