Solapur city central Election Results 2019: praniti shinde vs dilip mane, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | धाकधूक वाढली...स्ट्रॉगरूम उघडली... प्रतिनिधींसह कर्मचाºयांना दिली गोपनीयतेची शपथ
धाकधूक वाढली...स्ट्रॉगरूम उघडली... प्रतिनिधींसह कर्मचाºयांना दिली गोपनीयतेची शपथ

ठळक मुद्देमतदान केंद्रांवरील प्रत्येक हालचालीवर सीसी कॅमेºयाची नजरस्ट्राँगरूममधून ईव्हीएम काढून मतमोजणीस सुरूवात करेपर्यंत अर्धा तासाचा कालावधी जाणार मतदान केंद्रांच्या संख्येनुसार २0 ते २५ फेºयांत मतमोजणी पूर्ण होणार

सोलापूर : जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणीला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे़ तत्पुर्वी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदानानंतर ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या ती स्टाँग रूम  निवडणूक निर्णय अधिकारी व उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर उघडण्यात आली़ स्ट्राँगरूममधून ईव्हीएम काढून मतमोजणीस सुरूवात करेपर्यंत अर्धा तासाचा कालावधी जाणार आहे.  लवकरच मतमोजणीला सुरूवात होऊन पहिल्या फेरीचे निकाल हाती येणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली असून, गुरूवार, दिनांक २४ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता पहिल्या फेरीचा निकाल हाती येईल अशी यंत्रणा कार्यरत आहे़ यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर १४ टेबल करण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलला तीन कर्मचारी याप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी २५0 कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. ईव्हीएमवरील मतमोजणीच्या टेबलानंतर ही माहिती संकलित करण्यासाठी अतिरिक्त ४ टेबल प्रत्येक केंद्रावर राहणार आहेत. 

याशिवाय मतदान केंद्रांवरील प्रत्येक हालचालीवर सीसी कॅमेºयाची नजर असणार आहे. सकाळी स्ट्राँगरूममधून ईव्हीएम काढून मतमोजणीस सुरूवात करेपर्यंत अर्धा तासाचा कालावधी जाणार आहे. पहिल्या दोन फेºयांना तासभर लागणार आहे. त्यानंतरच्या फेºया १५ ते ३0 मिनिटांत पूर्ण होतील, असा विश्वास डॉ. भोसले यांनी व्यक्त केला. मतदान केंद्रांच्या संख्येनुसार २0 ते २५ फेºयांत मतमोजणी पूर्ण होणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत कल स्पष्ट होईल आणि एक ते दोन वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.  


Web Title: Solapur city central Election Results 2019: praniti shinde vs dilip mane, Maharashtra vidhan sabha election Results 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.