solapur central Election Results 2019: praniti shinde vs mahesh kothe, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | सोलापूर शहर मध्य निकाल: पुन्हा प्रणिती शिंदेंची पॉवर की इतिहास घडवणार अपक्ष महेश कोठे?

सोलापूर शहर मध्य निकाल: पुन्हा प्रणिती शिंदेंची पॉवर की इतिहास घडवणार अपक्ष महेश कोठे?

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवातशहर मध्य मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली

सोलापूर :  सोलापूर शहर मध्यविधानसभा मतदारसंघातील लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून विजयाचा षटकार ठोकण्याच्या इराद्यानेच काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, शिवसेनेचे दिलीप माने, अपक्ष महेश कोठे तर एमआयएम पक्षाकडून फारूक शाब्दी हे यावेळी मैदानात उतरले आहेत. परंतु, मागील दोन टर्म आमदार म्हणून नावलौकिक असलेल्या आ़ प्रणिती शिंदे यांना शिवसेनेचे दिलीप माने व अपक्ष महेश कोठे यांनी जोरदार लढत दिल्याने निकाल काय हाती येणार याकडे साºयांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सोलापूर शहर मध्य मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना २४०० मतं मिळाली असून एमआयएमचे फारूख शाब्दी यांना १८००, दिलीप माने यांना १६०० तर अपक्ष महेश कोठे यांना १५०० मते पडली आहेत.

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण १५ पेक्षा जास्त उमेदवार आहेत.

Web Title: solapur central Election Results 2019: praniti shinde vs mahesh kothe, Maharashtra vidhan sabha election Results 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.