करमाळ्यात शिवसेनेचा झेंडा; सभापतीपदी गहिनीनाथ ननवरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 14:20 IST2019-12-31T14:18:18+5:302019-12-31T14:20:13+5:30
माजी आमदार नारायण पाटील गटाचा जल्लोष; उपसभापतीपदी दत्तात्रय सरडे

करमाळ्यात शिवसेनेचा झेंडा; सभापतीपदी गहिनीनाथ ननवरे
करमाळा : करमाळा तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे गहिनीनाथ ननवरे यांची तर उपसभापतीपदी सेनेचेच दत्तात्रय सरडे यांची बिनविरोध निवड झाली़ नुतन सभापती व उपसभापती माजी आमदार नारायण पाटील गटाचे समर्थक आहेत.
मंगळवारी करमाळा पंचायत समिती कार्यालयात सभापती व उपसभापतीची निवडी पार पडल्या़ निवडीनंतर उपस्थित पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला़ करमाळा तालुका पंचायत समितीच्या सभागृहात एकूण दहा सदस्य आहेत. यात शिवसेनेचे पाच, आमदार संजय शिंदे गटाचे दोन तर बागल गटाचे दोन व माजी आमदार जयवंतराव जगताप गटाचे एक असे बलाबल आहे.
कोणत्याही गटाला बहुमत नसल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती़ दरम्यान, शिवसेनेने बागल गटाचे सदस्य स्वाती मुळे हे गेल्या दोन दिवसापासून स्वीच आॅफ झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.