Picture that the leaders are on the one hand and the voters on the other | मतदानावेळी नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडेच असल्याचे चित्र
मतदानावेळी नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडेच असल्याचे चित्र

ठळक मुद्देअनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात सन २०१४ च्या तुलनेत १ टक्का मतदान कमी झालेया निवडणुकीमध्ये नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडे असल्याचे चित्र प्रक र्षाने दिसून आले. नुकत्याच पार पडलेल्या मतदानात एकूण ३ लाख ५ हजार ४८० मतदारांपैकी २ लाख ४५८  मतदारांनी मताचा हक्क बजावला

अशोक कांबळे 

मोहोळ : होणार होणार म्हणून बहुचर्चित विधानसभेची निवडणूक यंदा एकदाची संपलीही.  अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मोहोळविधानसभा मतदारसंघात सन २०१४ च्या तुलनेत १ टक्का मतदान कमी झाले असले तरी सन २०१९ मध्ये मतदानाचा आकडा २० हजाराने वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. या निवडणुकीमध्ये नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडे असल्याचे चित्र प्रक र्षाने दिसून आले. 

सन २०१४ मध्ये २ लाख ८० हजार ३७७ मतदारांपैकी १ लाख ९१ हजार ५३६ इतके मतदान झाले होते. त्याची टक्केवारी ६६.८६ इतकी होती. तर नुकत्याच पार पडलेल्या मतदानात एकूण ३ लाख ५ हजार ४८० मतदारांपैकी २ लाख ४५८  मतदारांनी मताचा हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी ६५.६२ टक्के इतकी नोंदविली गेली आहे. गत निवडणुकीपेक्षा १ टक्का मतदान जरी कमी दिसत असले तरी २० हजार ४५८ मतदान या निवडणुकीत वाढले आहे.

मतदारसंघात शहरासह तालुक्यात रविवारी रात्रीपासूनच पाऊस सुरु होता. त्यामुळे सकाळच्या पहिल्या दोन तासात मतदारांची गैरसोय झाली, परंतु सकाळी ११ नंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदारसंघातील सर्वच मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. 

मतदारसंघातील कोळेगाव, कुरुल, सावळेश्वर, खुनेश्वर, अर्जुनसोंड, आष्टी या ६ ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या, परंतु सहायक निवडणूक अधिकारी जीवन बनसोडे व निवडणूक नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी तातडीने मशीन बदलून मतदान सुरळीत पार पडले. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले.

निवडणूक  प्रचारात तालुक्याच्या स्थानिक राजकारणातील एकमेकांची गटबाजी, एकमेकांच्या गटबाजीतून मतांची कशी होईल विभागणी, एकमेकांचे पाठिंबे यावरून एकमेकांची उणीदुणी काढण्यातच सर्वांनी धन्यता मानल्याचे चित्र प्रचारात दिसून आले. या निवडणूक प्रचारात नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडे असे चित्र निर्माण झाल्याने सुज्ञ मतदार व नवीन वाढलेल्या युवा मतदारांनी नेमका काय निर्णय घेतलाय हे २४ तारखेला मतमोजणीनंतरच समजणार आहे.

ठोस मुद्यांची वानवा
- मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या बाबतीत वंचित राहिल्याचे दिसत आहे.आजही  ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न, विजेचा प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, आष्टी उपसा सिंचन योजना, पोखरापूर तलावात पाणी सोडणे, शिरापूर उपसा सिंचन योजना, ५० वर्षांपासून रखडलेला मोहोळ शहराच्या कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, याबाबतचा ठोस अजेंडा घेऊन कोणीच प्रचारात उतरलेले दिसून आले नाही.

Web Title: Picture that the leaders are on the one hand and the voters on the other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.